28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराजकीयठाण्यात 30 एप्रिल ते 1 मे दरम्यान रंगणार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली...

ठाण्यात 30 एप्रिल ते 1 मे दरम्यान रंगणार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदोत्सव संगीत समारोह

टीम लय भारी :

ठाणे :  ठाणे (Thane) शहरात कायमच उत्तमोत्तम सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. अनेक मान्यवर कलाकार इथे येऊन दर्जेदार कार्यक्रम सादर करीत असतात. त्याचप्रमाणे ह्या वर्षी स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान ह्या नव्याने सुरू झालेल्या संस्थेने “आनंदोत्सव” संगीत समारोहाची घोषणा केली आहे. माननीय एकनाथ शिंदे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संगीत समारोह ठाण्यात ३० एप्रिल व १ मे ह्या दोन दिवशी गडकरी रंगायतन येथे संपन्न होणार आहे. (Thane anandotsav music festival Under the guidance of Eknath Shinde)

ज्येष्ठ गायक पद्मश्री सुरेश वाडकर, देवकी पंडित, आनंदगंधर्व आनंद भाटे, कौशिकी चक्रवर्ती, राकेश चौरसिया असे अनेक दिग्गज कलाकार ह्या संगीत समारोहात सहभाग घेणार आहेत. ह्या समारोहाचे निवेदन ज्येष्ठ सुप्रसिद्ध निवेदिका मंगला खाडिलकर, प्रसिद्ध निवेदक अभिनेता विघ्नेश जोशी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री, कवयित्री, निवेदिका स्पृहा जोशी करणार आहेत. सोबतच ह्या कार्यक्रमामध्ये धनंजय म्हसकर, ओमकार प्रभुघाटे, शाल्मली सुखठणकर, कल्याणी जोशी, ऋतुजा लाड, गंधार जोग ह्यांचाही समावेश आहे.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान ह्या संस्थेमार्फत हा कार्यक्रम सादर केला जाणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष केदार बापट ह्यांनी सांगितले. हा संगीत समारोह ३० एप्रिल शनिवार व १ मे रविवार ह्या दिवशी संपूर्ण दिवस गडकरी रंगायतन येथे संपन्न होणार आहे.

हा कार्यक्रमाचे संपूर्ण वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. जास्तीत जास्त रसिकांनी कार्यक्रम पहावा या साठी अतिशय माफक तिकीट दरामध्ये हा कार्यक्रम सर्वाना उपलब्ध होणार आहे.(Thane anandotsav music festival Under the guidance of Eknath Shinde)


हे सुद्धा वाचा :

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटाचा टिझर लाँच, १३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस

ठाणे महानगरपालिकेच्या नावाने महिलांनी फोडली मडकी

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव नवीन ठाणे-दिवा मार्गावर एसी गाड्यांचा करणार शुभारंभ

NGO carries out protest against TMC for engaging manual scavengers in Thane city

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी