32 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeमुंबई‘त्या‘ आजी एकनाथ शिंदेंना गद्दार बोलल्या

‘त्या‘ आजी एकनाथ शिंदेंना गद्दार बोलल्या

टीम लय भारी

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले. मुंबई, पुणे, कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरुन आंदोलने केली. या आंदोलनात ऐंशी वर्षांच्या आजी देखील सहभागी झाल्या होत्या. या आजींची यापूर्वी उध्दव ठाकरेंनी भेट घेतली होती.

एकनाथ शिंदे गद्दार आहेत. ते शिवसेना सोडून गेल्याने काही फरक पडणार नाही. त्यांनी गद्दारी केली आहे असे आजींनी आंदोलनाच्या वेळी सांगितले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या समर्थनार्थ आज संध्याकाळी शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेच्या विरोधात घोषणाबाजी केली.

काल झालेल्या विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात मोठे रणकंदन माजले आहे. एकनाथ शिंदेंनी 35 नाराज आमदारांना घेवून सुरत गाठले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व धोक्यात आले. या निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे अनेक आमदार नाराज होते. त्यांनी एकत्र येवून ही बंडाळी केल्याचे बोलले जात आहे. शिवसेना नेत्यांनी बंडाळी करण्याची अनेक कारणे आहेत. मात्र आता अल्पमतात आलेले महाविकास आघाडीचे सरकार तरणार की पडणार याकडे देशाचे लक्ष लागून आहे. कारण ‘मी पुन्हा येईन‘ अशी प्रतिज्ञा केले देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा :

आनंद दिघे, एकनाथ शिंदे नंतर ठाण्याची धूरा कोणाकडे

शिवसैनिकांनी दिला गद्दारांना शाप

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी