30 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeजागतिकनायगराचे सौंदर्य काचेतून पाहता येणार

नायगराचे सौंदर्य काचेतून पाहता येणार

टीम लय भारी

न्युयाॅर्कः जगप्रसिध्द ‘नायगरा‘ धबधब्याचे सौंदर्य जवळून पाहता येणार आहे. हा धबधबा पाहण्यासाठी काचेचा एक बोगदा तयार करण्यात आला आहे. नायगरा धबधबा पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. 2,300 फूट लांब बोगद्यातून त्याचे सौंदर्य पर्यटकांना न्याहाळता येणार आहे. त्या ठिकाणी काही वेळ थांबण्याची परवानगी देखील देण्यात आली आहे. काचेचे आवरण असलेली लिफ्ट नायगरा पाॅवरस्टेशन पासून 180 फूट धबधब्यापर्यंत नेता येते.

नायगरा तीन झरे मिळून बनलेला धबधबा आहे. नायगरा धबधबा कॅनडा, ओंटारिओ आणि अमेरिकेतील न्यूयाॅर्कच्या सीमेवर आहे. या तीन झऱ्यापैकी सर्वात मोठा ‘हाॅर्सशू’ धबधबा आहे. ज्याला कॅनडीयन धबधबा म्हणूनही ओळखले जाते. या पैकी दुसरा ‘अमेरिकन धबधबा’ आणि तिसरा ‘ब्राइडव वील धबधबा’ नावाने ओळखला जातो.

नायगरा धबधबा जगातील सर्वात मोठ्या धबधब्यांपैकी एक आहे. त्याची उंची 167 फूट आहे. पर्यटक बोटीतून हा धबधबा पाहण्यासाठी मोठी गर्दी करतात.

हे सुध्दा वाचा:

हरि नरके यांच्याकडून एकनाथ शिंदेंना झणझणीत सल्ला

भाजप आमदारावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा; उच्च न्यायालयाने नाकारला आहे जामीन, तरीही मंत्रीपदासाठी लॉबिंग !

जूनच्या अखेरीस मुंबईत पावसाची हजेरी

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी