32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रपुढील दोन दिवसांत मंत्री मंडळाचा विस्तार होण्याची शक्यता

पुढील दोन दिवसांत मंत्री मंडळाचा विस्तार होण्याची शक्यता

टीम लय भारी

मुंबई : शिंदे-भाजप सरकार स्थापन होऊन पूर्ण एक महिना होत आला तरी नव्या सरकारचा मंत्री मंडळ विस्तार अद्यापही झालेला नाही. राज्य मंत्रिमंडळ (cabinet) विस्ताराला होत असलेला विलंब यामुळे सर्वांकडूनच प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तर या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याची सुद्धा सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला होणाऱ्या विलंबामुळे विरोधकांकडून सुद्धा विद्यमान सरकारवर ताशेरे ओढण्यात येत आहेत.

पुढील दोन दिवसात म्हणजेच २९ जुलैपर्यंत शिंदे-भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार आहेत. यावेळी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये मंत्रिमंडळाची यादी निश्चित करण्यात येईल, अशी शक्यता आहे.

यामध्ये भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, प्रवीण दरेकर तर एकनाथ शिंदे यांच्या गटातून उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, नव्या सरकारला एक महिना होत आला तरी कोणत्या कारणांमुळे या नव्या सरकारचा मंत्री मंडळाचा विस्तार रखडला आहे, हे समजू शकलेले नाही.

हे सुद्धा वाचा :

बळीराजाला दिलासा! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ 13 महत्त्वपूर्ण निर्णय

शिवसेनेच्या काही बंडखोरांसाठी उद्धव ठाकरेच पक्षप्रमुख

मुख्यमंत्री शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, संदेशात ‘पक्षप्रमुख’ म्हणणे टाळले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी