31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराजकीयराज्यपालांनी सरकारला बजावली नोटीस

राज्यपालांनी सरकारला बजावली नोटीस

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्रात जोरदार सत्तानाट्य सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यालयामार्फत राज्य सरकारला नोटीस बजावण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे सरकार अस्थिर झालेले आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमार्फत घाईघाईत निर्णय घेण्यात आले होते. दोन दिवसांत १६० निर्णय घेण्यात आल्याची तक्रार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी २४ जून रोजी राज्यपालांकडे केली होती.

राज्यपालांनी सरकारला बजावली नोटीस

राज्यपालांनी सरकारला बजावली नोटीस

राज्यपालांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. त्या अनुषंगाने राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांना पत्र लिहिले आहे.

गेल्या आठवड्यात २२, २३ व २४ जून रोजी जारी करण्यात आलेले सर्व सरकारी आदेश (जीआर), परिपत्रके यांची माहिती या पत्रान्वये मागविण्यात आली आहे. हे निर्णय घेण्याची कारणमिमांसा स्पष्ट करण्याबाबत या पत्रात नमूद केले आहे.

हे सुद्धा वाचा :

देशाच्या हवामानात मोठा बिघाड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

बंडखोरांची 11 जुलैपर्यंत वाढली धडधड

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी