32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात मुसळधार पावसाला सुरुवात

राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात

टीम लय भारी
मुंबईः आज आठवडयाच्या पहिल्या दिवशी राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आणखी पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. राज्यातील जनजिवन विस्कळीत झाले आहे.रायगड जिल्हयातील चोळई गावावर दरड कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी हलवण्यात आले आहे.

मुंबई आणि उपनगरांना चार तास पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात जोरदार पावसाने हजेरी लावली असून, रत्नागिरी जिल्हातील नदया दुथडी भरुन वाहत आहेत. प्रशासनाने नागरिकांना काळाजी घेण्याचे आव्हान केले आहे. रायगड पोलादपूरमध्ये देखील जोरदार पावसाने जनजिवन विस्कळीत झाले आहे. मुंबई आणि उपनगराला पावसाने झोडपून काढले आहे. नवी मुंबई, कल्याण, डोबिवली, उल्हास नगरमध्ये जोरदार पावसाने जनजिवन विस्कळीत झाले आहे.

मुबई गोवा महामार्गावर पाणी साचून रस्त्यांना नदयांचे स्वरुप आले. चिपळूण खेडमध्ये’एनडीआरएफ’चे पथक दाखल झाले आहे.तळवडे नदीला पूर आला.वाहतुकीवर परिणात झाला असून, जनजिवन विस्कळीत झाले आहे. दोडा मार्गावर देखील पाणी साचलं. परशुराम घाटात तीन ठिकाणी दरड कोसळली. पुण्यात सायंकाळी पावसाची संततधार सुरु असून, वाहतूक कोंडी झाली. नागपूरमध्ये देखील संततधार पावसाला सुरुवात झाली आहे.

हे सुध्दा वाचा:

चरणमाळ घाटात ब्रेक निकामी झाल्याने बस अपघात

मुख्यमंत्री ‘ लिखापडींना‘ महत्व देत नाही

VIDEO : उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी केसरकरांनी घेतली डुलकी

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी