30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रअखेर राज्यातील 'सत्ता'नाट्याला लागला पूर्णविराम

अखेर राज्यातील ‘सत्ता’नाट्याला लागला पूर्णविराम

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्रात १० दिवसांपासून सुरु असलेल्या सत्ता संघर्षाच्या नाट्याला बुधवारी पूर्णविराम लागला. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचे आदेश कायम ठेवत आज गुरुवारी महाविकास आघाडीला बहुमत चाचणी सिद्ध करण्यास सांगितले. पण त्याआधीच उद्धव ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्री पदाचा त्याग करत असल्याचे जाहीर केले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजभवन गाठून आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सोपवला.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे ठाकरे घराण्याचे पहिले मुख्यमंत्री होते. २०१९ मध्ये शिवसेना पक्षाने भाजप सोबत निवडणूक लढविली. परंतु अडीच-अडीच वर्षाचा कार्यकाळ युतीला मान्य नसल्याने शिवसेना पक्षाने भाजपसोबत युती न करता काँग्रेस आणि रा. काँग्रेस या पक्षासोबत आघाडी केली. आणि महाराष्ट्र्रात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली. यावेळी कोरोना सारख्या महामारीचा देखील या सरकारने सामना केला.

उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर मात्र या आघाडीला सुरुंग लागला. एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून आपली गळचेपी होत असल्याचे कारण पुढे केले. त्यानंतर एकामागोमाग एक असे ४० पेक्षा अधिक शिवसेनेचे आमदार त्यांनी आपल्या गटात सहभागी करून घेतले. तर शिवसेनेच्या समर्थनात असलेल्या अपक्ष आमदारांना देखील त्यांनी आपल्याकडे वळवले.

विधान परिषद निवडणूक पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट आमदारांना घेऊन सुरत गाठले. त्यानंतर राज्यात कधी न घडलेले बदनखोरांचे सत्तानाट्य पाहायला मिळाले. यादरम्यान सेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपानंतर राज्यात दाक्षिणात्य चित्रपट सुरु आहे कि काय? असेच सर्वांना वाटू लागले. नितीन देशमुख यांनी केलेल्या खुलाशांमुळे बंडखोर गटातील आमदारांना पळवून नेल्याचे सांगण्यात येऊ लागले. ‘पण माझ्यासोबत असलेले आमदार येथे स्वतःच्या मनाने आहेत. ते आनंदात आहेत, काळजी करू नका,’ असे एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

या सर्व घडामोडींमध्ये शिवसेना आपला पक्ष आणि सत्ता वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आली. पण अखेर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्यास भाग पाडले. आणि बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश कायम ठेवले. एकनाथ शिंदे यांनी तब्बल ८ दिवसानंतर गुवाहाटी सोडून गोवा गाठले. यानंतर ते आज गुरुवारी आपल्या गटातील आमदारांना घेऊन महाराष्ट्रात येणार आहेत.

हे सुद्धा वाचा :

उध्दव ठाकरेंनी जाता जाता घेतले ‘लोकहिताचे‘ महत्वपूर्ण निर्णय

आदित्य ठाकरेंच्या तंबीनंतर बंडखोर आमदारांनी विधान भवनाकडे येण्याचा मार्ग बदलला

पुण्याला जिजाऊ नगर, शिवडी न्हावा शेवा मार्गाला ‘अंतुलेंचे‘ नाव देण्याची काॅंग्रेसची मागणी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी