29 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमुंबईट्विटरवर समस्या मांडली, अन् ती उद्धव ठाकरे यांनी ऐकून घेतली

ट्विटरवर समस्या मांडली, अन् ती उद्धव ठाकरे यांनी ऐकून घेतली

टीम लय भारी

मुंबई : उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ हा अडीच वर्षामध्येच संपुष्टात आला आहे. या अडीच वर्षात उद्धव ठाकरे यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. त्यांनी त्यांच्या या कार्यकाळात लोकांनी केलेल्या ट्विटला उत्तर देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या या समस्यांचे निराकारण देखील केले. अभिनेत्री राजश्री देशपांडे यांनी २०१९ मध्ये मराठवाड्याबाबतचे एक ट्विट केले होते. या ट्विटचा पाठपुरावा करून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी कशा प्रकारे मदत केली, याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे.

अभिनेत्री राजश्री देशपांडे यांनी त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी असतानाच एक किस्सा ट्विटरच्या माध्यमातून शेअर केलं आहे. यामध्ये त्यांनी २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटची दखल घेत कशाप्रकारे मदत केली याबाबत लिहिले आहे. ‘२०१९ मध्ये राजश्री देशपांडे यांनी मराठवाड्यातील ग्रामीण शाळांची जीर्ण परिस्थिती ट्विट केली होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी याची लगेच दखल घेतली. आणि आपण औरंगाबादला आहोत चर्चा करू. असे उत्तर दिले.’ त्यानंतर याबाबत उद्धव ठाकरे यांनी संपर्क करून संपूर्ण परिस्थिती जाणून घेतली. हा किस्सा शेअर करत राजश्री देशपांडे यांनी ‘Thank you @OfficeofUT sir for patiently listening to all the ground realities.Your humility humbleness will stay with me forever🙏’ असे ट्विट केले आहे.

हे सुद्धा वाचा :

अखेर राज्यातील ‘सत्ता’नाट्याला लागला पूर्णविराम

उध्दव ठाकरेंनी जाता जाता घेतले ‘लोकहिताचे‘ महत्वपूर्ण निर्णय

आदित्य ठाकरेंच्या तंबीनंतर बंडखोर आमदारांनी विधान भवनाकडे येण्याचा मार्ग बदलला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी