29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराष्ट्रीयघटस्फोटाचे कारण बनले 'मंगळसूत्र', वाचा सविस्तर...

घटस्फोटाचे कारण बनले ‘मंगळसूत्र’, वाचा सविस्तर…

टीम लय भारी

मुंबई : पती – पत्नीच्या घटस्फोटाचे एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. मद्रास हायकोर्टने घटस्फोटाच्या निर्णयावर सुनावणी देत विभक्त विवाहित महिलेने मंगळसूत्र काढून टाकले असेल तर पतीसाठी मानसिक क्रौर्य समजले जाईल असे म्हणून पतीचा घटस्फोट मंजूर केला आहे. न्यायमूर्ती व्हीएम वेलुमणी आणि न्यायमूर्ती एस. साँथर यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले आहे.

इरोड येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे सी. शिवकुमार यांनी त्यांच्या पत्नीच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर हा निर्णय सुनावण्यात आला.

यावेळी पती पत्नीच्या घटस्फोटासाठी मंगळसूत्र हे कारण ठरले असून यासंबंधीतील सी. शिवकुमार यांची याचिका मद्रास हायकोर्टाकडून  मंजूर केली आहे. या याचिकेत स्थानिक कौटुंबिक न्यायलयाचा 15 जून 2016 रोजीचा आदेश रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.

या घटनेत पत्नीने सी. शिवकुमार यांस घटस्फोट देण्यास नकार दिला होता. याबाबत अधिक चौकशी केली असता विभक्त झाल्यानंतर सुद्धा लग्नाचे प्रतिक म्हणून सोन्याची साखळी गळ्यात घातली होती, मात्र आता ती साखळी काढून ठेवली आहे.

यावर स्पष्टीकरण देताना मी केवळ साखळी काढून ते सोन्याचे प्रतिक ठेवले असल्याचे महिलेने म्हटले आहे. दरम्यान, महिलेच्या वकिलांनी हिंदू विवाह कायद्याच्या कलम 7 चा पुरावा देत सांगितले की गळ्यात तो सोन्याचा ऐवज घालण्याची गरज नाही आणि त्यामुळे त्या महिलेने तो काढून टाकल्याने वैवाहिक नातेसंबंधावर कोणताही परिणाम होणार नाही. परंतु विभक्त विवाहित महिलेने मंगळसूत्र काढून टाकले असेल तर पतीसाठी मानसिक क्रौर्य समजले जाईल असे म्हणत मद्रास हायकोर्टने पतीच्या बाजूने निकाल देत घटस्फोट मंजूर केला आहे.

हे सुद्धा वाचा…

‘ये पब्लिक है ये सब जानती है’, जितेंद्र आव्हाड इंधन दराच्या निर्णयावर गरजले

भीती खरी ठरली! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरावर आता शिंदे – फडणवीस सरकारची नवी खेळी

आजपासून पुढील 75 दिवस ‘कोविड बुस्टर’ डोस मिळणार मोफत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी