29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीयशिवसेनेचा मोठा निर्णय; बंडखोरांना बाळासाहेबांचे नाव वापरता येणार नाही, त्यांनी बापाचे नावाने...

शिवसेनेचा मोठा निर्णय; बंडखोरांना बाळासाहेबांचे नाव वापरता येणार नाही, त्यांनी बापाचे नावाने मते मागावीत

टीम लय भारी

मुंबई : शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची थोड्याच वेळापूर्वी बैठक पार पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरांना शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरता येणार नाही. त्यांनी स्वतःच्या बापाच्या नावाने मते मागावित अशा आशयाचा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला.

बैठकीत झालेल्या ठरावांची माहिती खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना दिली. साधारण सहा ठराव या बैठकीत झाले. त्यापैकी दोन ठराव महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांचे नाव बंडखोरांना वापरता येणार नाही. ज्यांनी बंडखोरी केली त्यांच्यावर कारवाई करण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार आज सायंकाळपर्यंत बंडखोरांवर कारवाई झालेली असेल, असे संजय राऊत म्हणाले.

आज झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उद्धव ठाकरे होते. ठाकरे यांच्या नेतृत्वावर यावेळी विश्वास ठेवण्यात आला. ठाकरे यांनी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख म्हणून केलेल्या कामाचे यावेळी कौतुक करण्यात आले.

शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे व राहील. प्रखर हिंदुत्वाचे धोरण घेवून शिवसेना पुढे जाईल. हिंदुत्वाच्या विचारांशी शिवसेनेने कधी प्रतारणा केली नाही, व भविष्यातही करणार नाही. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना भविष्यातही काम करेल, असे ठराव झाल्याचे संजय राऊत म्हणाले.

‘महाविकास आघाडी’ सरकार एकसंघ आहे, व भविष्यात सुद्धा ते एकसंघ राहील. शिवसेना रस्त्यावरची व कायदेशीर लढाई सुद्धा जिंकून दाखवेल, असेही राऊत यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा :

बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘कायदेशीर लढाईत काँग्रेसची भक्कम तयारी’

‘शिवसेना – बाळासाहेब गटा’ला कायदेशीर मान्यता नसल्याने तो अर्थहीन : अशोक चव्हाण

‘एकनाथ शिंदेंकडून भाजपला अद्याप कोणताही प्रस्ताव नाही’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी