34 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमुंबईमराठीला ‘अभिजात’ दर्जा मिळवून देण्यासाठी युवासेनेकडून सहा हजार पत्रे

मराठीला ‘अभिजात’ दर्जा मिळवून देण्यासाठी युवासेनेकडून सहा हजार पत्रे

टीम लय भारी

मुंबई : अभिजात मराठी दालनामार्फत लाखो पत्र राष्ट्रपतींना पाठवण्यात येणार आहे. त्यात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली आहे. मराठीला ‘अभिजात’ दर्जा मिळावा मुंबई विद्यापीठ युवासेना सिनेट सदस्य तसेच युवासेना कॉलेज कक्ष पदाधिकाऱ्यांनी (The state government) आज मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांची मंत्रालयातील दालनात भेट घेतली. (The state government sent ‘so many’ letters to the President)

यावेळी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी महामहिम राष्ट्रपती यांच्या नावे स्वाक्षरी केलेले सुमारे सहा हजार पत्रे श्री. देसाई यांना सुपूर्द केले. (The state government) यावेळी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, महादेव जगताप, शीतल देवरुखकर शेठ तसेच कॉलेज कक्षाचे ओमकार चव्हाण, ऋतिक ओझा, ऋषी साळवे, परिमळ देशमुख आदी उपस्थित होते. अभिजात मराठी जन अभियानंतर्गत पुढच्या टप्प्यात शाळा, महाविद्यालये, नाट्यगृहे या ठिकाणी हे अभियान चालविले जाईल, यात सिनेट सदस्य देखील सहभागी होतील, असे यावेळी युवासेना पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. हा दर्जा मिळाल्यानंतर राज्याला भाषेचा विकासासाठी भरीव अनुदान मिळते. केंद्र सरकारने आतापर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि ओडिआ या सहा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेला (The state government) अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

हे सुद्धा वाचा :- 

To get ‘elite’ status for Marathi language, the state government sent ‘so many’ letters to the President

मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी भाजपाकडून राज ठाकरेंचा वापर : नाना पटोले

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी