28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्र'द्रौपदी मुर्मू' यांचा विजय निश्चित; निकाल लागण्यापूर्वीच देशभरात जल्लोष

‘द्रौपदी मुर्मू’ यांचा विजय निश्चित; निकाल लागण्यापूर्वीच देशभरात जल्लोष

टीम लय भारी

मुंबईः देशाचे 15 वे राष्ट्रपती म्हणून एनडीएकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार ‘द्रौपदी मुर्मू’ यांचा विजय निश्चित आहे. जर मुर्मू यांचा विजय झाला. तर त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती असतील. राष्ट्रपती निवडणुकीच्या मतमोजणीत द्रौपदी मुर्मू आघाडीवर आहेत. 18 जूलैला राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडली. आज सकाळी 11 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीत खासदारांच्या मतांची मोजणी झाली. त्यात 540 खासदारांची मतं मिळाली. द्रौपदी मुर्मू यांना 70 टक्के मते मिळाली होती. तर यशवंत सिन्हा यांना 208 मतं मिळाली होती.

मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून द्रौपदी मुर्मू यांच्या ओरिसामधील गावात नाचगाणे करुन जल्लोष साजरा करण्यात आला. गावामध्ये पूजा पाठ केले जात होते. सुमारे 10 हजार लाडू मयुभंजच्या रायरंगपूरमध्ये बनवले. सगळे लाडू देशी तूपात बनवले होते. द्रौपदी मुर्मू यांच्या शाळेतील विदयार्थी शाळेमध्ये नाचत होते. पहिल्या फेरीत 15 खासदारांची मतं अवैध ठरवण्यात आली आहेत. यशवंत सिन्हांना 14 पक्षांचा पाठिंबा दिला होता. मुंबईत भाजपा कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्ते, नेते यांनी एकत्र येऊन जल्लोष केला. दादर, नरिमन पोईंट येथे जोरदार सेलिब्रेशन सुरु आहे. बोरीवली राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेर देखील जल्लोषाला सुरुवात झाली आहे.

मेळघाटमधील चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या कोटमी या गावामध्ये आदिवासी बांधवांनी जल्लोष सुरू केला. कोटमी या गावामध्ये आदीवासी बांधवांनी आदिवासी नृत्य करून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघात भाजपा कार्यकर्त्यांकडून ढोल ताशाच्या गजरासह फटाक्यांच्या आतिषबाजी करीत विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.

हे सुध्दा वाचा:

विदर्भात ‘तिबार पेरणी‘चे संकट

VIDEO : ईडीच्या चौकशी विरोधात काँग्रेसचे आंदोलन पेटले

VIDEO : नवी मुंबई महानगरपालिकेने वैतागून गाठली IIT मुंबई

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी