29 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रहवामान खात्याचा अंदाज सरस, 'या' ठिकाणी होणार ढगफुटी; वाचा सविस्तर...

हवामान खात्याचा अंदाज सरस, ‘या’ ठिकाणी होणार ढगफुटी; वाचा सविस्तर…

टीम लय भारी

मुंबई : राज्यात पावसाने गेल्या काही दिवसांपासून आपले चांगलेच बस्तान बसवले असून कुठे ‘मुसळधार’, तर कुठे ‘संततधार’ अशी स्थिती पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने मुंबईला आज ( दि.12 जुलै) सुद्धा ऑरेंज अलर्ट दिला असून राज्यातील काही ठिकाणी मुसळधार तर कुठे ढगफुटी होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

मुंबईत आज सुद्धा पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे. मुंबईतील उपनगरांसह अनेक भागांत पाऊस अक्षरशः धुमाकूळ घालत असल्याचे दिसत आहे. वांद्रे, अंधेरी, मालाड. कांदिवली, बोरीवलीसह उपनगरांमध्ये आज सुद्धा मुसळधारची स्थिती कायम असल्याचे दिसून येत आहे.

मुंबईसह राज्यात अन्य ठिकाणी सुद्धा पावसाने अगदी जेरीस आणले आहे. सलग दुसऱ्या दिवशी अक्कलकुवा, धडगाव, नवापूरमध्ये अतिवृष्टी कायम आहे, त्यामुळे या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान अतिवृष्टीमुळे शेती पाण्याखाली गेली आहे, तर कुठे घरांची पडझड झाली आहे.

कोकणात सुद्धा पावसाचा जोर कायम असून रत्नागिरीतील खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे स्थानिकांना अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी गड येथे ढगफुटी सदृष्य पाऊस पडत आहे परिणामी मंदिर परतीच्या मार्गावर संरक्षक भिंतीची माती वाहून गेल्याने चार भाविक दोन लहान मुले गंभीर जखमी झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्याला सुद्धा आज रेड अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. या आस्मानी संकटामुळे कुणाचे घर, कुणाची शेती वाहून गेल्याने राज्यातील जनतेत पुन्हा चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा :

11 जुलै…एक शोकांतिका !!

अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न कायमच; नागरिकांचा जीव अजूनही टांगणीला

अमित शहांच्या घरी खासदारांची गुप्त बैठक

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी