पुण्यात भर दिवसा बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात (gold shop) सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. वानवडी हद्दीतील वाडकर मळ्याशेजारी हे ज्वेलर्स (gold shop) आहे. या ठिकाणी हा दरोडा (robbery) टाकण्यात आला आहे. सात जण मिळून हा दरोडा (robbery) टाकला आहे. भरदिवसा टाकण्यात आलेल्या दरोड्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. साधारण दुपारी 12 च्या सुमारास दरोडेखोर मास्क लावून आले आणि त्यांनी दुकानदाराला धाक दाखवायला सुरुवात केली. शस्त्राचा धाक दाखवला आणि थेट दरोडा (robbery) टाकला. मास्क लावून आले आणि त्यांनी दुकानातील तब्बल 300 ते 350 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले.(Armed robbery in Pune! Seven people looted a gold shop)
चोरांनी सगळे दागिने लंपास केले आणि थेट दुचाकीवरुन फरार झाले. ही घटना कळताच पोलीस ज्वेलर्समध्ये दाखल झाले आहेत आणि सर्व तपास करत आहेत. या सगळ्या घटनेचा पंचनामा पोलीस करत आहेत. सीसीटीव्हीदेखील पोलीस तपासत आहे.
दुकानातील सिसिटीव्ही देखील तपासण्यात येत आहे. सीसीटीव्हीत दोन दरोडे खोरांनी बंदुकीचा धाक दाखवून दुकान लुटले आहे. घटनास्थळी डीसीपी आर राजा, सपोआ इंगळे यांच्यासह स्थानिक पोलीस अधिकारीदेखील पोहोचले आहेत. या दुकानातून साधारण 7 अनोळखी इसमांनी मास्क लावून बीजेएफ ज्वेलर्समधून 300 ते 400 ग्राम सोन्या चांदीचे दागिने लुटले आहे. दरोड्यात लाखोंचा मुद्देमाल लुटल्याची घटना घडली असून दुचाकीवरून आलेले आरोपी सोने घेऊन पसार झाले आहेत. वानवडी विभागाचे डीसीपी आर. राजा, गुन्हे शाखेचे डीसीपी यांच्यासह स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.या सगळ्या घटनेचा पंचनामा पोलीस करत आहेत. सीसीटीव्हीदेखील पोलीस तपासत आहे.