28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeटॉप न्यूजचार्ल्स शोभराजने काठमांडू विमान अपहरणानंतर एअर इंडियाच्या वतीने तालिबानशी केली होती मध्यस्थीची...

चार्ल्स शोभराजने काठमांडू विमान अपहरणानंतर एअर इंडियाच्या वतीने तालिबानशी केली होती मध्यस्थीची बोलणी

नेपाळच्या तुरुंगातून 19 वर्षांनी सुटलेला बिकिनी किलर चार्ल्स शोभराज आता फ्रान्समधील पॅरिस शहरात पोहोचला आहे. एअर इंडियाच्या विमानाचे 1999 मध्ये काठमांडू येथून अपहरण करण्यात आले होते. त्यावेळी चार्ल्स शोभराजनेच भारतातर्फे तालिबानी दहशतवाद्यांशी वाटाघाटी केल्या होत्या, असा धक्कादायक दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे. आपण अनेक चांगली कामे केली. मात्र, मीडियाने फक्त बिकिनी किलर म्हणून बदनाम केल्याची खंतही चार्ल्स शोभराजने वकिलाजवळ व्यक्त केली.

नेपाळच्या तुरुंगातून 19 वर्षांनी सुटलेला बिकिनी किलर चार्ल्स शोभराज आता फ्रान्समधील पॅरिस शहरात पोहोचला आहे. (Bikini Killer Charles Shobhraj) एअर इंडियाच्या विमानाचे 1999 मध्ये काठमांडू येथून अपहरण करण्यात आले होते. त्यावेळी चार्ल्स शोभराजनेच भारतातर्फे तालिबानी दहशतवाद्यांशी वाटाघाटी केल्या होत्या, असा धक्कादायक दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे. आपण अनेक चांगली कामे केली. मात्र, मीडियाने फक्त बिकिनी किलर म्हणून बदनाम केल्याची खंतही चार्ल्स शोभराजने वकिलाजवळ व्यक्त केली.

1970 च्या दशकात चार्ल्स शोभराजने आशियात 20हून अधिक तरुणींच्या हत्या केल्याचे उघड झाले होते. त्यावेळी मीडियाने त्याला ‘बिकिनी किलर’ म्हणून ओळख दिली होती. फ्रेंच नागरिक असलेला शोभराज हा इंडो-व्हिएतनामी वंशाचा आहे. सध्या त्यांचे वय 78 वर्षे आहे. आपल्याला नेपाळी कायद्यानुसार, ओपन हार्ट सर्जरी करण्यासाठी मुक्त करावे, अशी विनंती याचिका शोभराजने गेल्या वर्षी नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल केले होती. आपण 20पैकी 17 वर्षांची शिक्षा भोगली असून वृद्ध नागरिकांना मिळणारी सवलत देण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. शिक्षेच्या कालावधीतील चांगल्या वर्तणुकीच्या आधारे त्याला सोडण्यात यावे, अशी शिफारस तुरुंग प्रशासनाने यापूर्वीच केली होती. न्यायमूर्ती प्रसाद श्रेष्ठ आणि सपना प्रधान यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. नेपाळ सरकारने त्याला कोणतीही सूट देण्यास आक्षेप घेतला होता. मात्र, त्याचे वय आणि प्रकृती लक्षात घेता मानवतेच्या दृष्टीकोनातून शस्त्रक्रियेसाठी त्याला मुक्त करण्याचे आदेश नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला.

काठमांडू तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर चार्ल्स शोभराजला नेपाळमधून हद्दपार करण्यात आले. तो प्रवासी विमानाने फ्रान्समध्ये पोहोचला आहे. कोट्यवधीच्या संपत्तीचा मालक असूनही फ्रान्सला जाण्यासाठी भाड्याचे पैसेही शोभराजकडे नव्हते. त्याचे वकील गोपाळ चिंतन शिवकोटी यांनी त्यांच्या तिकीटासाठी 70 हजार रुपयांची मदत केली. या वकिलानेच चार्ल्ससाठी कपड्यांचीही व्यवस्था केली. म्हातारा झाला तरी चार्ल्सच्या ऊंची आणि शानशौकी राहणीमानात काहीही फरक पडलेला नाही. आजही तो सेलिब्रेटी सिंड्रोमने त्रस्त आहे. त्याला सतत प्रसिद्धीच्या झोतात राहायला आवडते. तरीही तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर चार्ल्स शोभराज मीडियाशी एक शब्दही बोलला नाही. आपल्याला रॉयल्टी दिली गेली तरच आपण बोलू, अशी त्यांची भूमिका आहे. फ्रान्समधील एका टीव्ही चॅनेलने त्याला मुलाखतीसाठी चांगली ऑफर दिल्याची चर्चा आहे.

काठमांडू येथून 1999 मध्ये झालेल्या एअर इंडिया अपहरण प्रकरणाशी शोभराजचा संबंध असल्याचा किस्सा वकील गोपाळ शिवकोटी याने माध्यमांना सांगितला आहे. चार्ल्सनेच ही माहिती दिल्याचा वकिलांचा दावा आहे. त्यानुसार, काठमांडू येथून एअर इंडिया विमानाचे अपहरण झाल्यानंतर चार्ल्स शोभराज हा सतत तालिबानच्या संपर्कात होता. मात्र, तो भारत सरकारसाठीच, एअर इंडियाच्या वतीने तालिबानशी मध्यस्थी म्हणून बोलणी करत होता. त्याने हे अतिशय चांगले काम केले; पण त्यांची दखल घेतली गेली नाही. अर्थात, त्याचा तालिबान्यांशी आधी काही संबंध होता का? एअर इंडियाने खरेच त्याला वाटाघाटी करण्यास सांगितल्या होत्या का, यावर अजून प्रकाश पडलेला नाही.

हे सुद्धा वाचा : 

त्या सेलिब्रिटींनी शेतकऱ्यांचं अभिनंदन करावं, भाजपला टॅग केलं तरी हरकत नाही

सर्वाधिक सर्च केलेल्या सेलिब्रिटींची यादी जाहीर, सिद्धार्थ शुक्ला पहिल्या, सलमान खान दुसऱ्या क्रमांकावर?

परदेशातही आहेत देवीची शक्तीपीठे

कुणीही चार्ल्सला पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी तो एवढा मोठा सीरियल किलर आहे, असे म्हणू शकत नाही, असेही वकील शिवकोटी याने माध्यमांना सांगितले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची चांगली छाप पडायची, तो बुद्धिजीवी व्यक्तीसारखा वागायचा, गुन्हेगारांची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. 19 वर्षे काठमांडू तुरुंगात चार्ल्स शोभराज हा सातत्याने वाचण्यात आणि लेखनात मग्न असायचा. त्याने शिक्षा उपभोगतान कधीही पूर्वायुष्यातील गोष्टींची चर्चा केली नाही, असेही चार्ल्स शोभराजच्या वकिलाने सांगितले.

Bikini Killer Charles Shobhraj, Shobhraj Negotiated with Taliban, Air India Flight Abduction Kathmandu

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी