30 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरटॉप न्यूजलढाई जिंकली! ओबीसींना राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा, निवडणुका लवकरच होणार

लढाई जिंकली! ओबीसींना राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा, निवडणुका लवकरच होणार

टीम लय भारी

दिल्ली : ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. बांठिया अहवालावर शिक्कामोर्तब करीत आरक्षणाप्रमाणे निवडणुका घ्याव्यात असा निर्देशच आज सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे. येणाऱ्या दोन आठवड्यांत उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत निर्णय घेण्याचे कोर्टाकडून बजावण्यात आले आहे. आधीसारखं सरसकट ओबीसी आरक्षण सगळ्याच निवडणुकांमध्ये लागू करण्याच्या कोर्टाच्या या निर्णयाने राज्याला अखेर खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

बांठिया आयोगाच्या अहवालानुसार राज्यात ओबीसी आरक्षणाचा नियम स्थगित झालेल्या 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुका आणि इतर निवडणुकांसुद्धा लागू करण्यात आला आहेत. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या लढाईला आज अखेर यश मिळाले आहे.

दरम्यान, बांठिया अहवालात आवश्यक बाबींची पूर्तता झाल्याचे स्पष्टीकरण देत उर्वरीत निवडणुका दोन आठवड्यात घेण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. कोर्टाच्या निर्णयामुळे बांठिया आयोगाच्या अहवालानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना 27 टक्क्यांपर्यंत आरक्षण मिळणार आहे.

न्यायमुर्ती खानविलकर यांच्या खंडपीठासमोर आज ही सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान वॉर्ड पुनररचनेचा मुद्दा निवडणूक आयोगानं पाहावा, असे कोर्टाने यावेळी सांगितले. प्रलंबित निवडणुक प्रश्नाच्या मुद्द्यावर टिप्पणी करीत दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा असे निर्देश सुद्धा कोर्टाकडून देण्यात आले आहेत.

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली लागल्यामुळे महानगरपालिका आणि इतर राज्यातील निवडणुकाचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी राज्य सरकारचे वकील शेखर नाफडे यांनी यावर युक्तीवाद केला, तर सादर केलेल्या अहवालात बऱ्याच त्रुटी असल्याचे याचिकाकर्ते विकास गवळी यांनी यावेळी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर ओबीसी राजकीय आरक्षणाचा आमच्या महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला! सर्वोच्च न्यायालयातून ओबीसी राजकीय आरक्षणाला मान्यता मिळणे हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय आहे. ओबीसी कल्याण, बहुजन कल्याण, गरिब कल्याण हाच आमचा अजेंडा होता, आहे आणि राहील. ओबीसी राजकीय आरक्षण प्राप्त करून देण्याच्या प्रक्रियेतील सहभागी सर्वांचे मन:पूर्वक आभार असे म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा…

शिवसेनेतील बंडखोरांनी ‘पक्षघटनेला‘च फासला हरताळ

बाॅलीवूडवर पुन्हा ईडीचे संकट, ‘पॅडमान’ निर्माती प्रेरणा अरोरा अटकेत

सत्ता संघर्षाच्या तिढयाला ‘राज्यपाल’ जबाबदार ?

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!