28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeटॉप न्यूजलता मंगेशकर यांच्या गाण्यांची 'स्वरमैफल', महान गायिकेला वाहणार स्वरांजली

लता मंगेशकर यांच्या गाण्यांची ‘स्वरमैफल’, महान गायिकेला वाहणार स्वरांजली

टीम लय भारी

मुंबई : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना रसिकांच्या वतीने स्वरांजली वाहण्यात येणार आहे. लता मंगेशकर यांच्या गाण्यांवर आधारित ‘गाये लता गाये लता’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वांद्रे पूर्व येथील बाल गंधर्व रंगमंदिरात येत्या २६ आणि २७ फेब्रुवारीला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते रात्री १० अशी ही मैफल रंगणार आहे(Concert of Lata Mangeshkar’s songs, tribute through the songs).

१६५ हुन अधिक गाण्याद्वारे या महान गायिकेला स्वरांजली वाहण्यात येणार आहे. ग्लिटराटी एंटरटेनमेंट सोल्युशन्स प्रा.ली.च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘गाये लता गाये लता’ या कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्या प्रारंभीच्या काळातील म्हणजे १९४९ च्या आतापर्यंतच्या १६५ गाण्यांचा असणार आहे. यात मुजरा गीतापासून अंगाई गीतापर्यंत विविध गीत प्रकारांचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

लता मंगेशकर यांना पडद्यावर साकारण्यात अमृता रावला वाटते धन्यता

लतादीदींना श्रद्धांजली वाहताना संसदही झाले भावुक

Lata Mangeshkar : लता मंगेशकरांनी सांगितली रेडिओवरील पहिल्या गाण्याची आठवण !

Saeed Naqvi | A monochromatic wasteland cannot create another Lata Mangeshkar 

खेमचंद प्रकाश यांच्यापासून ए. आर. रहमान या संगीतकारांची लता मंगेशकर यांनी गायलेली गाणी नव्या पिढीच्या गायिका सादर करतील. वयाच्या नवव्या वर्षांपासून ३ दशकं स्टेजवर लता मंगेशकर यांची गाणी सादर करत असलेल्या बेला सुलाखे आणि सध्याच्या आघाडीच्या गायिका शैलजा सुब्रमणियन या कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्या गायकीच्या विविध छटा सादर करतील. यांना अपूर्वा पेंढारकर आणि रत्नागिरीची ईशानी पाटणकर या गायिकांची साथ लाभणार आहे. गायक नचिकेत देसाई आणि गोव्याचा सुधाकर शानभाग हे युगुल गीत गाऊन कार्यक्रमाला बहार आणतील.

अनुपम घटक हे या कार्यक्रमाचे संगीत संयोजन करणार आहेत. आमदार ऍड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. दोन दिवसात दररोज ३ याप्रमाणे लता मंगेशकर यांना स्वरांजली वाहणारे ६ कार्यक्रम सादर होतील. सकाळी १० वाजता , दुपारी २ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता असे कार्यक्रमाचे नियोजन आहे. प्रत्येक कार्यक्रमात नवी गाणी सादर होतील. आठ दशकांच्या त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा गायनपट उलगडण्याचा प्रयत्न का कार्यक्रम करेल, अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक शैलेश पेठे यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी