टॉप न्यूज

मुंबईत लग्न समारंभाला आलेल्या पुण्यातील ४२ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण

टीम लय भारी

मुंबई/पुणे : पुण्यातील एका ४२ वर्षीय महिलेला कोरोनाची (Coronavirus) लागण झाल्याचे निष्पन्न आहे. तिची प्रकृती अत्यवस्थ असून व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. या महिलेने परदेश प्रवास केलेला नाही. मात्र तरीही तिला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा अहवाल शनिवारी समोर आला आहे. विशेष म्हणजे, त्याआधी या महिलेने मुंबईत एका लग्न समारंभात हजेरी लावल्याचे उघडकीस आल्याने आता प्रशासनाची धावपळ उडाली आहे.

याआधी कोरोना व्हायरसचे आढळळेले जवळपास सर्वच रुग्ण परदेश दौऱ्यावरून आलेले आहेत. मात्र, या महिलेची कुठल्याही परदेश दौऱ्याची हिस्ट्री नाही. तिला पुण्यात राहूनच संसर्ग झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू असून डॉक्टरांनी तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले. गेल्या २४ तासांपासून ती व्हेंटिलेटरवर आहे.

या ४२ वर्षीय महिलेने मुंबईतील एका लग्नात नुकतीच हजेरी लावली होती. यानंतर १६ मार्चला श्वसनात त्रास होत असल्याने तिला उपचारासाठी पु्ण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर तिच्या घशात खव-खव आणि श्वास घेण्यात आणखी त्रास होण्यास सुरुवात झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता तिच्या स्वॅबचे नमूने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्यामध्ये तिचा एच१एन१ चा रिपोर्ट निगेटीव्ह आला. तर कोरोना व्हायरसचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे ती कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आली असावी असे सांगितले जात आहे.

दरम्यान, राज्यात शनिवारी कोरोनाग्रस्तांची संख्या ११ ने वाढून तब्बल ६३ झाली आहे. एका दिवसात राज्यात झालेली ही सर्वात मोठी वाढ असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

अभिषेक सावंत

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

23 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

23 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

1 day ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

1 day ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

1 day ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

1 day ago