टॉप न्यूज

देवेंद्र फडणवीसांना फोन टॅपिंग अहवाल गहाळ प्रकरणी समन्स

टीम लय भारी

मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा समावेश असलेल्या राज्य गुप्तचर विभागाच्या (एसआयडी) कागदपत्रं गहाळ प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सायबर सेलकडून समन्स बजावण्यात आलं आहे. सायबर सेलने साक्षीदार म्हणून त्यांचं म्हणणं नोंदवण्यासाठी समन्स बजावण्यात आलं असल्याची माहिती शुक्रवारी मॅजिस्ट्रेट कोर्टात दिली. फडणवीस यांनी मार्चमध्ये दिलेल्या मुलाखतीचा हवाला देत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून कागदपत्रे मागण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली आहे. पोलिसांच्या याचिकेवर न्यायालय मंगळवारी निर्णय देणार आहे. दरम्यान यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे(Devendra Fadnavis summoned for phone tapping report).

फडणवीसांनी केला होता खुलासा

२३ मार्च २०२१ रोजी एका पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तींमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी काही कागदपत्रे आणि तत्कालीन एसआयडी आयुक्त रश्मी शुक्ला यांनी त्यांच्या आरोपांच्या समर्थनार्थ तयार केलेल्या अहवालांकडे लक्ष वेधलं होतं. त्यांनी असा दावा केला होती की, राज्याने अहवालावर कारवाई केली नाही आणि म्हणून ते पेन ड्राईव्हसह संपूर्ण साहित्य गृहमंत्रालयाकडे सोपवणार आहेत.

अयोध्येत जमीनी घेणं म्हणजे हिंदुत्वाचा चोरबाजार; शिवसेनेचा हल्लाबोल

काँग्रेसचं सत्तेतील स्थान तिसरं, निधी मिळवण्यात पटकावला दुसरा क्रमांक

गृह मंत्रालयाकडून कागदपत्रे आणि तांत्रिक पुरावे मागणाऱ्या राज्य सरकारने दाखल केलेल्या अर्जावर मॅजिस्ट्रेट कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी फडणवीसांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

फडणवीसांनी स्पष्टीकरण देताना काय म्हटलं आहे?

“मला सायबर सेलने चौकशीसाठी बोलावलं नसून एक प्रश्नावली पाठवली आहे. त्यानंतर सायबर सेलचं एक पत्र मिळालं असून त्यावर योग्यवेळी बोलेन असं सांगितलं आहे. न्यायालयीत प्रकरणानंतर त्यावर मी बोलेनच. विरोधी पक्षनेता म्हणून भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढण्याचा माझा अधिकार आहे. त्यासाठी माहिती कुठून मिळाली हे विचारण्याचा सरकारला अधिकार नाही,” असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

दलालांचा ठेकेदार भारतीय जनता पक्षाने काँग्रेसकडे बोट करू नये! : नाना पटोले

FPJ legal l State says Devendra Fadnavis to be its star witness in phone tapping case

चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया 

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली असून कोर्टाने चारवेळा बोलावूनही हजर झाले नाहीत असं विचारलं असता म्हणाले की, “कोर्टाने बोलावल्यानंतर आपण मुदत मागू शकतो, त्यानुसार त्यांनी मागितली की नाही याची कल्पना नाही. पण त्यांनी काही केली नाही त्यामुळे ते कशाला घाबरत नाहीत. त्यामुळे ते कोर्टासमोर जातील, त्यात काळजी करण्याचं काही कारण नाही”.

Team Lay Bhari

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

1 day ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

1 day ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

1 day ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

1 day ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

1 day ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

1 day ago