टॉप न्यूज

भाजप सरकारने धनगर समाजासाठी 1 रुपयाही दिला नाही, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 1000 कोटीची केली होती घोषणा : धनंजय मुंडे यांचे टीकास्त्र

टीम लय भारी

मुंबई : मागील भाजप सरकारने काळात 2019 मध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धनगर समाजासाठी 13 योजना घोषित केल्या. त्यासाठी 1 हजार कोटी जाहीर केले. प्रत्यक्षात मात्र 1 रुपयाही दिला नाही, अशा शब्दांत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपची पोलखोल केली ( Dhananjay Munde said, BJP cheated to Dhangars).

धनगर समाजाचे ( Dhangar reservation ) मागासलेपणाची पाहणी करण्यासाठी ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’ या संस्थेची नेमणूक भाजप सरकारने केली होती. पण संस्थेने दिलेला अहवाल न्यायालयात सादर करण्यास भाजप सरकारने उशीर केल्याचाही आरोप मुंडे ( Dhananjay Munde slam to BJP ) यांनी यावेळी केला.

हे सुद्धा वाचा

राज्यपाल कोश्यारी यांनी घेतली कोव्हॅक्सीन लस

सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार

आशिष शेलारांचा आरोप : मंत्रालयातून महापालिकेच्या अधिकारांवर गदा

Dhangars unite to fight for their reservation rights

विद्यमान ‘महाविकास आघाडी सरकार’ मात्र धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या न्यायालयीन प्रक्रियेसह समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. समाजाच्या विकासासाठी आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर आखलेल्या १३ विकास योजनांना ‘महाविकास आघाडी’ सरकार अंमलात आणील. त्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे  मुंडे यांनी विधानपरिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले ( Dhananjay Munde said, Mahavikas Aghadi government will help to Dhangar community ).

आमदार शरद रणपिसे, आमदार भाई जगताप, आमदार जयंत आसगावकर, आमदार महादेव जानकर ( Mahadev Jankar ), आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) आदींनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या वतीने धनंजय मुंडे हे बोलत होते.

मुंडे पुढे म्हणाले की, सन २०२० – २१ या कालावधीत धनगर समाजाच्या विकासासाठी घोषित करण्यात आलेला ५१ कोटी रुपये कोविडचे निर्बंध असताना देखील काही प्रमाणात वितरित करण्यात आलेला आहे ( Dhananjay Munde said, Mahavikas Aghadi government distributed some amount for Dhangars ). येत्या काळात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही ते म्हणाले.

तुषार खरात

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

23 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

24 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

1 day ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

1 day ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

1 day ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

1 day ago