29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeटॉप न्यूजमोदींचा खास मित्र डोनाल्ड ट्रम्पवर पॉर्नस्टार प्रकरणासह आणखी 34 आरोप!

मोदींचा खास मित्र डोनाल्ड ट्रम्पवर पॉर्नस्टार प्रकरणासह आणखी 34 आरोप!

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एका पॉर्नस्टारला पैसे दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. ट्रम्प हे पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्सच्या प्रकरणात मॅनहॅटन कोर्टात हजर झाले होते. ट्रम्प न्यायालयात पोहोचताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. यानंतर, ग्रँड ज्युरीच्या आरोपांचे न्यायालयात वाचन करण्यात आले. ज्युरीने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तब्बल 34 आरोप लावले. यावर, ट्रम्प यांनी न्यायालयासमोर आपण निर्दोष असल्याचे सांगितले. यावेळी न्यायालयाने ट्रम्प यांना 1.22 लाख डॉलरचा दंड ठोठावला आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खास मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याचबरोबर, डोनाल्ड ट्रम्प हे गुन्हेगारी आरोपांना सामोरे जाणारे अमेरिकेचे पहिलेच राष्ट्रपती ठरले आहेत.

मोदींचा खास मित्र डोनाल्ड ट्रम्पवर पॉर्नस्टार प्रकरणासह आणखी 34 आरोप!

या प्रकरणात 2016 च्या निवडणुकीपूर्वी पॉर्नस्टार डॅनियल स्टॉर्म्स हिला तिने तोंड बंद ठेवावे म्हणून पैसे दिल्याप्रकरणी मंगळवारी (दि. ३) न्यूयॉर्कच्या मॅनहटन न्यायालयासमोर ते शरण आले होते. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदावर राहिलेल्या व्यक्तीस 234 वर्षांच्या इतिहासात प्रथमच फौजदारी प्रकरणाचा सामना करावा लागत आहे. ट्रम्प समर्थकांची संतप्त भावना पाहता न्यूयॉर्क न्यायालयात सुनावणीदरम्यान 25 हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त होता. न्यायालय परिसरासोबत ट्रम्प टॉवरच्या आसपास बॅरिकेड्स लावण्यात आले होते. न्यूयॉर्कसोबत वॉशिंग्टनमध्ये कॅपिटल हिल आणि अन्य शहरांतही सुरक्षा वाढवली होती. या खटल्यामुळे 2024 मध्ये पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये दाखल होण्याचे ट्रम्प यांचे स्वप्नही भंगण्याची शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रम्प अटकेनंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, अमेरिकेत असे काही घडू शकते असे मला कधीच वाटले नव्हते. माझ्या देशाचे निर्भयपणे रक्षण करणे हा एकमेव गुन्हा मी केला आहे.

मोदींचा खास मित्र डोनाल्ड ट्रम्पवर पॉर्नस्टार प्रकरणासह आणखी 34 आरोप!

काय आहे आरोप?

पोर्नस्टार डॅनियल हिने ट्रम्प यांच्यासोबत तिचे 2006 मध्ये अनैतिक संबंध असल्याचा दावा केला होता. 2016 मधील अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी स्वतःचे माजी वकील मायकेल कोहेन यांच्या माध्यमातून ट्रम्प यांनी डॅनियल्सला तिने गप्प राहावे म्हणून 130,000 डॉलर अदा केले होते, असा आरोप आहे. अर्थात अमेरिकेत विवाहेतर संबंध गुन्हा नाही, लैंगिक संबंधाबद्दल पैसे देणेही गुन्हा नाही. मात्र, ट्रम्प यांनी पॉर्न स्टारला दिलेला पैसा हा खर्च म्हणून अन्य निवडणूक खर्चात दाखविला, असा त्यांच्यावर आरोप आहे.

हे सुद्धा वाचा: 

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात प्रतिनिधीगृहात महाभियोग मंजूर, कारकिर्दीत दोनदा महाभियोग येणारे पहिलेच राष्ट्राध्यक्ष

भारताच्या 5 पट महागाई दर असणारा ‘पाक’ विनाशाच्या उंबरठ्यावर: इम्रान खान

चीनमध्ये तिसऱ्यांदा हुकूमशहा जिनपिंगची सत्ता!

Donald Trump porn star case, Donald Trump porn star case 34 more accusations

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी