दिल्लीतील (delhi) विवेक विहार येथे बेबी केअर हॉस्पिटल (Baby Care Hospital) येथे लहान मुलांच्या रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर फुटून लागलेल्या आगीत ( Fire breaks) सात बालकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत पाच बालके होरपळली असून एका बालकाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.या प्रकरणी रुग्णालयाच्या चालकाला अटक करण्यात आली आहे.हॉस्पिटलमध्ये मालक डॉ. नवीन किची आणि घटना घडली त्यावेळी ड्युटीवर असलेले डॉ. आकाश यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता अनेक मोठमोठे खुलासे पुढे येत आहेत. डॉ. किची यांच्याकडे रुग्णालय चालवण्यासाठीचं कुठलंच वैध डॉक्युमेंट नाही. त्यांच्या रुग्णालयाचा परवाना ३१ मार्च २०२४ रोजी संपला आहे.(Fire breaks out at Baby Care Hospital in Delhi; Investigation found several irregularities)
याशिवाय त्यांना केवळ पाच बेडचं केअर सेंटर चालवण्याची परवानगी होती. परंतु ते १२ बेडचं रुग्णालय चालवत होते. पोलिस उपायुक्त सुरेंद्र चौधरी यांनी सांगितलं की, डीजीएचएसकडून परवाना देण्यात आलेला होता. परंतु तो परवाना ३१ मार्च २०२४ रोजी संपला आहे. परवाना संपल्यानंतर केवळ पाच बेड ठेवण्याची परवानगी होती. परंतु घटनेच्या वेळी १२ नवजात बालके दाखल होते.
आग ( Fire breaks) लागली तेव्हा रुग्णालयात कुठलंही आगरोधक यंत्र उपलब्ध नव्हतं. कोणत्याही अप्रिय घटनेसाठी आवश्यक असणारी आपत्कालीन सुविधा उपलब्ध नव्हती. महत्त्वाचं म्हणजे नवजात शिशूंवर उपचार करणारे योग्य डॉक्टर रुग्णालयाकडे नव्हते, केवळ बीएएमएस डिग्री घेतलेले डॉक्टर काम करत होते.
नेमकी घटना काय?
शाहदरा भागातील विवेक विहार येथे ‘बेबी केअर न्यू बॉर्न'(Baby Care Hospital) रुग्णालयातील शिशु देखभाल केंद्राला शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आग ( Fire breaks) लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. जवानांनी खिडकी तोडून बारा बालकांना बाहेर काढले. मात्र, त्यातील सात बालकांचा मृत्यू झाला, तर पाच बालके होरपळली. या बालकांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यातील एकाला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. या रुग्णालयाशेजारीच असलेल्या दोन ते तीन इमारतींनाही आगीचा झळा बसल्या. स्फोटानंतर शिशु देखभाल केंद्रात ऑक्सिजनचे अनेक सिलिंडर अस्ताव्यस्त पडले होते.
आगीमागील कारण निश्चितपणे समजले नसले तरी, सिलिंडर रिफिल करीत असताना स्फोट होऊन आग ( Fire breaks) लागल्याचे समजते. काही वेळातच आगीने रुद्र रुप धारण केले. इमारतीच्या तळमजल्यापासून तिसऱ्या मजल्यापर्यंतचा भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. इमारतीबाहेर असलेले एक वाहन पूर्णपणे जळाले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बालकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान निधीतून मदत जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालकांच्या मृत्युबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मृत्युमुखी पडलेल्या बालकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमी झालेल्यांसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून देण्याचे त्यांनी जाहीर केले.
चौकशी समिती स्थापण्याचे आदेश
दिल्लीत रुग्णालयाला लागलेल्या आगप्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी मुख्य सचिव नरेशकुमार यांना दिले आहेत. पीडितांना सर्व प्रकारची मदत करण्याचे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही सक्सेना यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.