टॉप न्यूज

मजेशीर चिन्हानी ग्रामपंचायत निवडणूक रंगतदार; हिरवी मिरची, ढोबळी मिरची ते लॅपटॉप, मोबाईल चार्जर, माउस व्हाया पांगुळगाडा

टीम लय भारी : अतुल माने, वरिष्ठ पत्रकार

मुंबई : लॅपटॉप, मोबाईल चार्जर, माउस, संगणक ते ढोबळी मिरची, फुल कोबी, अननस, हिरवी मिरची, आले, अशा मजेशीर आणि थोड्या वेगळ्या असलेल्या चिन्हानी 2021 मधील पहिली वहिली होत असलेली ग्रामपंचायत निवडणूक (Gram Panchayat Election) अतिशय रंगतदार आणि धमाल होणार आहे.

येत्या 15 जानेवारीला राज्यातील 35 जिल्ह्यातील एकूण 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या ग्रामपंचायतींची मुदत 17 मार्च 2020 रोजी संपली होती. पण कोविड-19 या विषाणूमुळे त्यावेळी संपूर्ण निवडणूक कार्यक्रमात स्थगित करण्यात आला होता. लॉकडॉउन मुळे तो संपूर्ण रद्द करण्यात आला. आता नव्याने अधिसूचना जारी करत ही निवडणूक होत आहे.

यावेळी निवडणूक आयोगाने 109 चिन्हांची यादी जाहीर केली आहे. कोणतीही निवडणूक मग ती ग्रामपंचायत असो की लोकसभा चिन्हांचे महत्व खूप असते. लक्षात राहणारे चिन्ह मिळावे म्हणून अनेक जण प्रयत्न करत असतात. निवडणूक प्रचारात मोठ्या खुबीने या चिन्हांचा वापर केला जातो.

साधारणपणे ग्रामपंचायत निवडणूक ही कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही. येथील स्थानिक गट, आघाडी यामधून पॅनल तयार होते. त्यामध्ये विविध पक्षीय लोकांची सरमिसळ असते. त्यामुळे अन्य चिन्हे निवडणुकीत वापरली जातात.

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या 109 चिन्हांची यादी पाहिली तर ती गमतीदार वाटते. या चिन्हामध्ये पाव, ब्रेड, नेलकटर, कंगवा, याबरोबरच भाज्या, सफरचंद, अननस, फ़ुलकोबी, ढोबळी मिरची, हिरवी मिरची, मका, आक्रोड अशी संपूर्ण भाजी मंडई चिन्हातून आणण्यात आली आहे.

 

याचबरोबर संगणक, पेन ड्राइव्ह, मोबाईल चार्जर, माऊस, स्विच बोर्ड, लॅपटॉप, ही विकासात्मक चिन्हे पहिल्यांदा देण्यात आली आहेत. यासह रिक्षा, फुगा, बादली, केक, कपबशी, चष्मा, हॉकी, किटली, टोपली, पांगुळ गाडा, विहीर, शिट्टी, चमचा, टूथ ब्रश, टूथ पेस्ट, कॅरम बोर्ड आदी 109 विविध चिन्हांचा समावेश आहे.

कोणत्याही उमेदवाराला चिन्ह निवडताना पाच चिन्हे प्राधान्य क्रमाने द्यायची असून त्यातील एक चिन्ह निवडावे लागणार आहे.

दरम्यान या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी लाखो रुपयांच्या ऑफर्स देण्यात येत असून त्या विरोधात अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पद्धतीने धनदांडगे लोक ग्रामपंचायती मध्ये मोठ्या प्रमाणात शिरकाव करतील आणि हे धोकादायक असल्याचे मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

1 day ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

1 day ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

1 day ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

1 day ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

1 day ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

1 day ago