33 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeटॉप न्यूजपाकिस्तानचे पंतप्रधान उघड्यावर, निवासस्थान दिले भाड्याने

पाकिस्तानचे पंतप्रधान उघड्यावर, निवासस्थान दिले भाड्याने

 

टीम लय भारी
दिल्ली : पाकिस्तानी पंतप्रधान यांचे अधिकृत निवासस्थान भाड्याने देण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेले आहे. देश आर्थिक विंवचनेत असताना मिळेल त्या मार्गाने पैसे मिळवण्यासाठी पाकिस्तान चे प्रयत्न चालू आहेत. (Pakistan to rent pm house to support economy of the nation)

तेहरिक-ए-इंसाफ सत्तेत असतानाच पंतप्रधान इम्रान खान यांनी 2019 मध्ये निवस्थान रिकामे केले होते. त्यावेळी पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे विद्यापीठात रूपांतर करण्याची योजना होती. त्यानंतर पंतप्रधान इम्रान खान हे आपल्या बानी गाला येथे वास्तव्य करून आहेत. व ते फक्त पंतप्रधान कार्यालयाचा वापर करतात.

अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी, मेल आणि युट्युब होणार बंद

Pakistan
पंतप्रधान अधिकृत निवासस्थान

नारायण राणे सरसावले, अगरबत्तीवाल्यांसाठी !

सरकारने मालमत्ता भाड्याने देण्याचा निर्णय घेतल्यानंतर या परिसरात सामान्य जनतेला अनेक कार्यक्रम करण्याची मुभा दिली आहे. त्यामध्ये फॅशन, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्याची परवानगी दिली गेली आहे.

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे निवासस्थानातील सभागृह, दोन अतिथींसाठीची सभागृहे व लॉन भाड्याने देण्यात येतील.

या भाड्याने दिलेल्या वास्तू व त्यांच्या पवित्रतेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यासाठी सरकारने दोन समित्या स्थापन केलेल्या आहेत. या समित्या पंतप्रधान निवासस्थानी सर्व शिस्तबद्ध होत आहे ना तसेच कोणत्याही प्रकारच्या सजावटीचे नुकसान होत नाही याची काळजी घेतील.

इस्राईलच्या राष्ट्रगीताची धून चोरण्याच्या आरोपावरून अनु मलिक होतोय ट्रोल

Video : सांगलीत मुख्यमंत्री दौऱ्या दरम्यान भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांना भिडले

देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पंतप्रधानांनी कठोर पावले उचलली आहेत. अर्थव्यवस्थेचा भार हलका व्हावा व देशाला थोडी मदत व्हावी याची काळजी पंतप्रधान घेत आहेत. तरीही गेल्या तीन वर्षांत पाकिस्तानची अर्थव्यवस्था 19 अब्ज डॉलरने कमी झाली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी