29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeटॉप न्यूजWhat An Idea : 500 स्क्वेअर फुटाचे एका बॉक्समध्ये फोल्ड करून कुठेही...

What An Idea : 500 स्क्वेअर फुटाचे एका बॉक्समध्ये फोल्ड करून कुठेही नेता येणारे अनोखे घर

आनंद महिंद्रा यांनी काल फोल्डिंग हाऊसचा एक धमाल व्हायरल व्हिडिओ शेअर केला आहे. 500 स्क्वेअर फुटाचे एका बॉक्समध्ये फोल्ड करून कुठेही नेता येणारे अनोखे घर त्यात दाखविलेले आहे. ही भन्नाट आयडिया भारतासारख्या देशासाठी वरदान ठरू शकेल, असे महिंद्रा यांनी म्हटले आहे.

ट्विटरवरील कल्पक सेलिब्रिटी असलेल्या सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी काल एक धमाल व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हायरल व्हिडिओ फोल्डिंग हाऊसचा आहे. (Readymade Movable Folding House) 500 स्क्वेअर फुटाचे एका बॉक्समध्ये फोल्ड करून कुठेही नेता येणारे अनोखे घर त्यात दाखविलेले आहे. ही भन्नाट आयडिया भारतासारख्या देशासाठी वरदान ठरू शकेल, असे महिंद्रा यांनी म्हटले आहे.

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष असलेले आनंद महिंद्रा हे सातत्याने नाविन्यपूर्ण कल्पना ट्विटरद्वारे शेअर करत असतात. त्यांचे ट्विट अनेक नव्या गोष्टींची माहिती देतात, तर कधी-कधी गमतीशीर घडामोडीही ते शेअर करत असतात. महिंद्रा यांनी गुरुवारी ट्विटरवर शेअर केलेला फोल्डिंग हाऊसचा व्हिडिओ असाच भन्नाट आहे. या व्हिडिओमध्ये काही कर्मचारी एक मोठा बॉक्स क्रेनच्या सहाय्याने उघडताना दिसतात आणि काही मिनिटात त्याचे घरामध्ये रूपांतर होते. 500 चौरस फुटाचे हे अनोखे घर आहे. हे फोल्डेबल घर पाहून ट्विटर यूजर्स थक्क झाले आहेत. हे घर कुठेही नेऊन ठेवता येऊ शकते. या घराची किंमत सुमारे 40 लाख रुपये आहे, असे आनंद महिंद्रा सांगतात. नैसर्गिक आपत्तीनंतर हे घर म्हणजे एक चांगला निवारा गृह असू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले आनंद महिंद्रा?

“40 लाख रुपयांत, 500 स्क्वेअर फूट फोल्डेबल घर,” असे आनंद महिंद्रा यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. आपल्या देशात परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा हा सोपा मार्ग आहे. जोशीमठमध्ये घरांना तडे गेल्याने लोकांना पळून जावे लागत आहे. अशा परिस्थितीत भारतात अशी इनोव्हेशन म्हणजे लोकांना एक उत्तम पर्याय असू शकतो, असे आनंद महिंद्रा यांनी म्हटले त्यांच्या या पोस्टवर युझर्सही कॉमेंट्स करत आहेत. एका यूझरने लिहिले की, ‘फोल्ड करण्यायोग्य घरे ठीक आहेत; परंतु 40 लाखांच्या किंमतीत ते भारतात परवडणारे नाही. शिवाय, आपल्या देशात हे घर ठेवायला जमीन मिळणार नाही. शहरांत तर जमीन खूपच महाग आहे.’ दुसऱ्या एका युझरने लिहिले की, ‘100 स्क्वेअर फुटासाठी 8 लाख? योग्य काँक्रीट पाया आणि मजबूत लोखंडी खांब असलेल्या बांधकामाची किंमत प्रति 100 चौरस फूट 2 ते 2.5 लाख रुपये आहे.’ एका ट्विटर युझरने लिहिले आहे की, ‘मला वाटते महिंद्राजींनी या व्यवसायात पुढाकार घ्यावा. भारतात ही घरे 10 लाखांपेक्षा कमी किमतीत असणे अत्यंत आवश्यक आहे. भारतातील लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यात महिंद्रा समूह मोठी भूमिका बजावू शकतो.’

हे सुध्दा वाचा : 

मी कधीही श्रीमंत व्यक्ती होऊ शकत नाही; आनंद महिंद्रांचे कौतुकास्पद विधान

भारतीय कंपनी लाँच करणार 16 इलेक्ट्रिक कार, 3000 कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा

विवेक अग्निहोत्रीच्या मुलीचे बेशरम रंग व्हायरल; भगव्या बिकीनीतील अश्लील फोटोवरून हिंदुत्वाचा पठाण अडचणीत !

Readymade Movable Folding House, Foldable Home, एका बॉक्समध्ये फोल्ड करून कुठेही नेता येणारे अनोखे घर, Fantastic Viral Video, Anand Mahindra Tweets

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी