27 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरटॉप न्यूजVideo : ‘रिपब्लीक टीव्ही’च्या अतिशहाण्या पत्रकारांना मुंबईकर पत्रकारांकडून चोप

Video : ‘रिपब्लीक टीव्ही’च्या अतिशहाण्या पत्रकारांना मुंबईकर पत्रकारांकडून चोप

टीम लय भारी

मुंबई : आदळआपट व थयथयाटी पत्रकारीतेसाठी ओळखल्या जात असलेल्या ‘रिपब्लीक टीव्ही’च्या दोन पत्रकारांना मुंबईकर पत्रकारांनी आज चांगलाच चोप दिला ( Republic journalist beaten by Mumbaikar journalist ).

‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’च्या (एनसीबी) कार्यालयाबाहेर विविध वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी वार्तांकनासाठी जमले होते. यावेळी दिल्लीहून आलेल्या ‘रिपब्लीक टिव्ही’च्या दोन पत्रकारांनी अतिशहाणपणा केला.

एनडीटीव्ही आणि एबीपी या दोन वृत्तवाहिन्यांवर ‘रिपब्लीक’च्या पत्रकारांनी टीका केली. मुंबईकर पत्रकारांना ‘चाय बिस्कूट खाणारे गरीब पत्रकार’ अशा शब्दांत हिणवले. त्यामुळे ‘रिपब्लीक’च्या पत्रकारांना मुंबईकर पत्रकारांनी भाषा आवरती घेण्याची विनंती केली. त्यावर ‘रिपब्लीक’च्या पत्रकारांनी आणखी आकांडतांडव केले. त्यामुळे संतापलेल्या मुंबईकर पत्रकारांनी ‘रिपब्लीक’च्या पत्रकारांना चांगलाच चोप दिला. यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद वाढणार नाही याची काळजी घेतली.

विशेष म्हणजे, दिल्लीहून आलेल्या या दोघांपैकी एकजण पत्रकार नाही. ‘रिपब्लीक टिव्ही’च्या चर्चेत सहभागी होणारा तो ‘गेस्ट’ आहे. तरीही या पत्रकार नसलेल्या व्यक्तीला वार्तांकनासाठी ‘रिपब्लिक टिव्ही’ने कसे काय पाठविले असाही सवाल उपस्थित झाला आहे. या ‘गेस्ट’ असलेल्या तथाकथित पत्रकारांनेच आकांडतांडव करून मुंबईकर पत्रकारांबद्दल अपशब्द काढल्याने हा वाद चिघळल्याचे घटनास्थळी असलेल्या पत्रकारांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

सद्सदविवेकबुद्धी असलेल्या सामान्य जनतेमधून ‘रिपब्लीक टिव्ही’च्या थयथयाटी पत्रकारितेबद्दल नेहमीच रोष व्यक्त करण्यात येतो. पण पत्रकारिता क्षेत्रातूनही अर्णव गोस्वामी आणि त्यांच्या ‘रिपब्लीक टिव्ही’बद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. आजच्या घटनेनंतर मुंबईकर पत्रकारांनी ‘रिपब्लीक’च्या अतिशहाणपणाबद्दल निषेध व्यक्त केला आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!