30 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeटॉप न्यूजनियमांमध्ये बदल : सिलेंडर बुकिंगसह ट्रेन वेळापत्रक आणि एसबीआय बचत खात्यांसाठी नवी...

नियमांमध्ये बदल : सिलेंडर बुकिंगसह ट्रेन वेळापत्रक आणि एसबीआय बचत खात्यांसाठी नवी नियमावली

टीम लय भारी

नवी दिल्ली :  रविवार 1  नोव्हेंबर 2020 पासून देशभरातील चार क्षेत्राच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. सिलेंडर बुकिंग ते ट्रेनच्या वेळापत्रक एसबीआयच्या बचत खात्यावरील व्याजात ही कपात होणार आहे. या व्यतिरिक्त डिजिटल पेमेंटवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या सर्व गोष्टींचा सामान्य व्यक्तिच्या खिशावर थेट भार पडण्याची शक्यता आहे. ज्या क्षेत्रामध्ये नियम बदलण्यात आले आहे त्याची माहिती जाणून घेऊयात.

LPG सिलेंडरच्या डिलिव्हरी प्रक्रियेत बदल 

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच LPG सिलेंडरच्या घरी पोहचण्याचा प्रक्रियेत बदल होणार आहे. तेल कंपन्या डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (DAC) सिस्टिम लागू करणार आहे.

सिलेंडरची खरेदी करणाऱ्या ग्राहकाला तो घरी पोहचण्यापूर्वी त्याच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होणार आहे. त्यामुळे ज्या वेळी तुमच्या घरी सिलेंडर येईल त्यावेळी तुम्हाला ओटीपी दाखवावा लागणार आहे.

एखाद्या ग्राहकाचा मोबाईल क्रमांक अपडेटेड नसल्यास डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तिकडून उपलब्ध असलेल्या अॅपच्या माध्यमातून तत्काळ स्वरुपात नंबर अपडेट करण्याची सुविधा आहे.

एसबीआयच्या बचत खात्यावर व्याज कपात

एसबीआयने ज्या खात्यात एक लाख रुपयांपर्यंत रक्कम असल्यास त्यावर ०.२५ टक्क्यांनी घट करत ३.२५ टक्के व्याज दिले जाणार आहे. तसेच एक लाखांहून अधिक रक्कम खात्यात असलेल्या ग्राहकांना रेपो रेटनुसार व्याज दिला जाणार आहे.

डिजिटल पेमेंटवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही आहेत. मात्र पंन्नास कोटी रुपयांहून अधिक टर्नओव्हर असलेल्या उद्योजगांसाठी डिजिटल पेमेंट वापरणे अनिवार्य असणार आहे.

रेल्वेचे वेळापत्रक बदलणार 

आजपासून रेल्वेचे वेळापत्रक सुद्धा बदलले जाणार आहे. ऑक्टोंबर महिन्यातच यात बदल करण्यात येणार होते.परंतु ती तारीख वाढवली गेली. १ नोव्हेंबरपासून रेल्वेचे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे.

तसेच १३ हजार प्रवासी आणि सात हजार मालभाड्यांच्या ट्रेनच्या वेळापत्रक बदल होणार आहे. देशातील 30 राजधान्यांमध्ये सुद्धा वेळापत्रक बदल केले जाणार आहेत. या व्यतिरिक्त महाराष्ट्रात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वेळेत सुद्धा बदल केले गेले आहेत.

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना फटका

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक पैसे काढणे किंवा भरण्यावर चार्ज वसूल केला जाणार आहे. चालू खाते, कॅश क्रेडिट लिमिट आणि ओवरड्राफ्ट अकाउंट मधून जमा केलेले पैसे काढणे आणि बचत खात्यामधून ही पैसे काढल्यास त्यावर वेगवेगळे शुल्क आकारले जाणार आहेत.

कर्ज खात्यासाठी महिन्यातून तीन वेळा जेवढ्या वेळेस अधिक पैसे काढल्यास तर ग्राहकांना प्रत्येकवेळी 150 रुपये द्यावे लागणार आहेत. तसेच बचत खात्यात तीन वेळेस पैसे जमा केल्यास त्यावर कोणताही शुल्क आकारला जाणार नाही. मात्र चौथ्या वेळेस ग्राहकांना 40 रुपये द्यावे लागणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी