32 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeटॉप न्यूजपोलिस अधिकारी बदल्यांचा घोळ सुरूच; गृह विभागाने तीन दिवसात फिरवला आदेश!

पोलिस अधिकारी बदल्यांचा घोळ सुरूच; गृह विभागाने तीन दिवसात फिरवला आदेश!

बदली आदेशाची शाई वाळण्याच्या आतच शिंदे-फडणवीस सरकारने सुधारित पदस्थापना आदेश जारी केले आहेत. नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आयजी) असलेले बी.जी. शेखर यांची बदली रद्द करून त्यांना त्याच जागी कायम ठेवले गेले आहे. लोहमार्ग पोलीस आयुक्त म्हणून रवींद्र शिसवे यांची वर्णी लावण्यात आली आहे. यानिमित्ताने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे.

महाविकास आघाडी सरकारवर उठसूठ बदल्यांचा घोळाचा आरोप करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना स्वत:ही गृहमंत्री म्हणून पोलिस बादल्यांमधील घोळ मिटविण्यात अपयश आले आहे. (IPS Transfers) पोलिस अधिकारी बदली आदेशाची शाई वाळण्याच्या आतच शिंदे-फडणवीस सरकारने आज सुधारित पदस्थापना आदेश जारी केले आहेत. अवघ्या तीन दिवसांत पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली आदेशात सुधारणा करण्याची नामुष्की शिंदे-फडणवीस सरकारवर ओढवली आहे. यानिमित्ताने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. बदल्यातील घोळामुळे हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर या दोघा नेत्यांमधील “सुसंवाद” चर्चेचा विषय ठरला आहे. बदल्यांचा आदेश तडकाफडकी फिरविण्यामागे काही राजकीय समीकरणे असल्याचे तर्कवितर्क लढविले जात असून राजकीय वर्तुळात फडणवीस यांच्या फजितीची खमंग चर्चा सुरू आहे.

गृह विभागाने 13 डिसेंबर रोजी 30 हून अधिक आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश जारी केले होते. विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी यात होते. मात्र, आज तडकाफडकी सुधारित पदस्थापना आदेश जारी केले गेले. त्यानुसार, नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आयजी) असलेले बी.जी. शेखर यांची बदली रद्द करून त्यांना त्याच जागी कायम ठेवले गेले आहे. लोहमार्ग पोलीस आयुक्त म्हणून रवींद्र शिसवे यांची वर्णी लावण्यात आली आहे. कोल्हापूरचे आयजी म्हणून सुनील फुलारी यांची बदली आज केली गेली. आधी त्यांची नाशिक आयजी म्हणून बदली केली गेली होती. ती नव्या आदेशात रद्द करून शेखर यांना धक्का लावणे टाळले.

संजय दराडे, सुहास वारके हे बदलीच्या प्रतीक्षेत होते. दराडे यांना बृहन्मुंबई विशेष शाखेत अप्पर पोलिस आयुक्तपद देण्यात आले आहे. वारके यांना पोलिस महासंचालक कार्यालयात कायदा व सुव्यवस्था आयजी केले गेले आहे. कोल्हापूर आयजीमनोज लोहिया यांना पिंपरी-चिंचवड सह आयुक्तपद देण्यात आले आहे. अमिताभ गुप्ता यांना पुण्यात अपर महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) म्हणून पदस्थापना देण्यात आली आहे. रंजनकुमार शर्मा यांना पुणे शहर पूर्वचे अपर पोलिस आयुक्त बनविण्यात आले आहे. संजय मोहिते यांना नवे मुंबईत सह पोलिस आयुक्त केले गेळे आहे, तर सुरेशकुमार मेंगडे यांना पद अवनत करून नवी पदस्थापना दिली गेली आहे. मेंगडे हे सिडकोचे नवे मुख्य दक्षता अधिकारी असतील.

हे सुद्धा वाचा : 

IPS अधिकाऱ्याची कौतुकास्पद कामगिरी, लेकीचा विवाह सोहळा बाजूला ठेवला, अन् बिकट प्रसंगात कर्तव्यावर हजर राहिला

IAS, IPS दुष्काळी भागात घडणार; प्रभाकर देशमुखांचा कल्पक उपक्रम!

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरूच !

गेल्या महिन्यातच वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना बदलीनंतर तब्बल तीन आठवड्यांनी पोस्टिंग दिली गेली होती. तोच घोळाचा कित्ता शिंदे-फडणवीस सरकारने सुरू ठेवला आहे.

पोलिस बदल्यांचे आदेश

IPS Transfers, Senior Police Officers, Shinde Fadanvis Government Mess, बदल्यांचा घोळ

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी