34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeटॉप न्यूजदुकानांच्या पाट्यांवर ‘मराठी’ होणार मोठी, इंग्रजी होणार छोटी; मंत्री सुभाष देसाईंचा दणकेबाज...

दुकानांच्या पाट्यांवर ‘मराठी’ होणार मोठी, इंग्रजी होणार छोटी; मंत्री सुभाष देसाईंचा दणकेबाज निर्णय

टीम लय भारी

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक शहरांमधील दुकानांसमोर इंग्रजी भाषेतील फलक मोठ्या अक्षरात लावले जातात. तर त्या फलकाच्या कोपऱ्यात मराठीतील इवलीही अक्षरे दिसतात. दुकानदारांच्या या ‘मराठी’द्वेष्टेपणाला मंत्री सुभाष देसाई यांनी चांगलाच दणका दिला आहे.(Subhash Desai’s banging decision, ‘Marathi’ will be big on shop signs)

दुकानांच्या सगळ्या पाट्यांवर आता मराठी भाषेतील नावे मोठ्या आकारात नमूद करण्याचे आदेश देसाई यांनी दिले आहेत. दुसऱ्या बाजूला कमी उत्पन्न असलेल्या दुकानदार व व्यावसायिकांनाही मराठी भाषेतील फलक लावण्याचा सुधारित आदेश देसाई यांनी जारी केला आहे.

‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७’ या कायद्यात पाट्या मराठीत असण्याबाबत तरतूद आहे. पण दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने या नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले. त्यामुळे या कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव सुभाष देसाई यांच्या मराठी भाषा खात्याने तयार केला होता. त्याला काल मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे(Maharashtra Shops and Establishments Act, 2017 provides for boards in Marathi).

त्यामुळे मोठ्या प्रमाणेच छोट्या दुकानावरील पाट्याही आता मराठीतच कराव्या लागतील. बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेढ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेता यापुढे रस्त्यालगतच्या सर्वच दुकांनावरील पाट्या मराठीत लागलेल्या दिसतील. मराठीत – देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशीही दुरुस्ती मंजूर करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

उद्योग मंत्री सुभाष देसाई दुर्गम भागातील संकटग्रस्तांसाठी आले धावून

सुभाष देसाईंनी एमआयडीसीच्या माध्यमातून पुरग्रस्तांना केली मदत

नैसर्गिक वायू निर्मिती कंपन्यांची राज्यात 16 हजार 500 कोटींची गुंतवणुक

Extend concession on Ajang MIDC land rate: Subhash Desai

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी