30 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरटॉप न्यूजअविवाहित महिलांच्या गर्भपातासंदर्भात सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

अविवाहित महिलांच्या गर्भपातासंदर्भात सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

टीम लय भारी

दिल्ली : अविवाहित महिलांच्या गर्भपातासंदर्भातील एक महत्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणावर सुनावणी करताना अविवाहित महिलादेखील गर्भपात करू शकतात, असा निर्णय दिला आहे. न्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. काही दिवसांपूर्वी अविवाहित महिलेला गर्भपात करण्याची परवानगी दिल्ली हायकोर्टाकडून नाकारण्यात आली होती. पण आता हाच निर्णय सुप्रीम कोर्टाकडून बदलण्यात आला आहे.

दिल्लीत एका प्रकरणात अविवाहित महिलेला गर्भपात करण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. त्या महिलेच्या गर्भाला २३ आठवड्यांचा कालावधी झाला होता. २३ आठवडे पूर्ण झाल्यामुळे गर्भपात करणे म्हणजे एका जीवाचा जीव घेणे असल्याचे मत दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश सतीश चंद्र शर्मा आणि न्यायाधीश सुब्रह्मण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने व्यक्त केले होते. आणि याचमुळे त्या अविवाहित महिलेला गर्भपात करण्यापासून रोखण्यात आले होते.

दरम्यान, आता सुप्रीम कोर्टाने हा निर्णय बदललेला आहे. एखादी महिला अविवाहित आहे पण ती गर्भवती आहे म्हणून तिच्या मनाविरोधात जाऊन तिला गर्भपात करण्यापासून रोखता येऊ शकणार नाही. असेही न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाकडून सांगण्यात आले.

यावेळी या खंडपीठाने मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेंसी कायदा २०२१ मधील संशोधनाचा उल्लेख केला. तसेच गर्भपातासंबंधीच्या कायद्यात अविवाहित महिलेच्या गर्भपाताबाबत कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही, असे सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिकेत सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा :

विदर्भात ‘तिबार पेरणी‘चे संकट

सणांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

शिवसेनेचा आणखी एक खासदार शिंदे गटात जाण्याची शक्यता

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!