28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeटॉप न्यूजपालकांनो, मुलांना "ही" दोन कफ सिरप दिली तर, अनर्थ घडेल!

पालकांनो, मुलांना “ही” दोन कफ सिरप दिली तर, अनर्थ घडेल!

मुलांना खोकला झाला म्हणून पालकांनी दिलेल्या कफ सिरपचे सेवन केल्यामुळे उझबेकिस्तानामध्ये (Uzbekistan) तब्बल १९ चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला होता. “मारयॉन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड” या मूळच्या भारतीय कंपनीने तयार केलेल्या कफ सिरपच्या (Cough Syrup) सेवनाने ही दुर्दैवी घटना झाल्याचा दावा उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने केला होता. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) “मारयॉन बायोटेक” या भारतीय कंपनीनेने तयार केलेली ही दोन कफ सिरप मुलांना पाजू नयेत, असे आवाहन केले आहे. (Two cough syrups made by India’s Marion Biotech should not be used for children)
मागील डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात कफ सिरॅपच्या सेवनाने १९ लहान मुलांचा दुर्दैवी अंत झाला होता. या मुलांना श्वसनाचा विकार जडला होता. या मुलांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी “डॉक १ मॅक्स” हे औषध पाजले होते. २ ते ७ दिवस हे औषध ३ ते ७ दिवस देण्यात आले होते. प्रमाणापेक्षा जास्त औषध दिल्याचे उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हंटले आहे.

पालकांनो, मुलांना "ही" दोन कफ सिरप दिली तर, अनर्थ घडेल!

हे सुद्धा वाचा

धनूभाऊंच्या भेटीला पंकजाताई ब्रिच कॅन्डी रुग्णालयात; आस्थेने केली तब्बेतीची विचारपूस

मुंबई ते उरण, पनवेल, अलिबाग प्रवास होणार सुसाट; शिवडी ते न्हावाशेवा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड नोव्हेंबरपासून होणार खुला

एसटी संप काळात मृत्यू झालेल्या १२४ कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार नोकरी

रंगात वापरण्यात येणाऱ्या सेंद्रिय संयुगांचा औषधासाठी वापर
उत्तरप्रदेश येथील “मारयॉन बायोटेक” या कंपनीकडून “डॉक १ मॅक्स” (DOK-1 Max) आणि “अँब्रोनॉल” (Ambronol) ही दोन कफ सिरप बनवण्यात येतात. मात्र, ही दोन औषधे बनविताना नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या कंपनीने “डायइथिलीन ग्लायकोल” (Diethylene glycol) तसेच “इथिलीन ग्लायकोल” ( ) या घटकांचा (organic compound) अधिक प्रमाणात वापर केल्याचे समोर आले आहे. रंग, शाई, अंतर्वस्त्रे बनविण्यासाठी “डायइथिलीन ग्लायकोल”चा वापर करण्यात येतो. या दोन कफ सिरपची चाचणी घेण्यात आल्यानंतर ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.


जम्मू काश्मीरमध्येही ११ लहानग्यांचा हृदयद्रावक अंत
२०१९ सालीही जम्मू-काश्मीरमध्ये कफ सिरपचे सेवन केल्यामुळे २ महिने ते ६ वर्षे या वयोगटातील ११ लहानग्यांचा मृत्यू झाला होता. “डिजिटल व्हिजन (Digital Vision) या भारतीय कंपनीने हे कफ सिरप तयार केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी