33 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
Homeटॉप न्यूजउद्धव ठाकरेंची घोषणा : ‘लॉकडाऊन’ नाही, पण निर्बंध कायम

उद्धव ठाकरेंची घोषणा : ‘लॉकडाऊन’ नाही, पण निर्बंध कायम

टीम लय भारी

मुंबई : ‘लॉकडाऊन’ हा शब्द मी वापरणार नाही. पण याचा अर्थ असा नव्हे की, सगळे व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत. उलट ‘कोरोना’च्या विचित्र आजारामुळे आणखी जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे जनेतेने घरातच थांबावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे ( Uddhav Thackeray appeal to people ) .

मुख्यमंत्र्यांनी आज सोशल मीडियातून जनतेशी संवाद साधला. राज्याचे अर्थचक्र सुरू व्हावे यासाठी आपण काही निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा. कामाशिवाय घराबाहेर पडू नका. १ जुलैपासून सुद्धा ही बंधने पाळा असे ठाकरे म्हणाले (Unlock from 1st July ) .

Mahavikas Aghadi

ते म्हणाले की, ‘लॉकडाऊन’शब्द वापरणार नाही. पण त्याचा गैरअर्थ लावू नका. उलट जास्त काळजी घ्या. आई, वडील, लहान मुले, वृद्ध यांची विशेष काळजी घ्या. आता तरूणांमध्येही ‘कोरोना’चे संक्रमण वाढू लागले आहे. परंतु त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. अशा तरूणांकडून घरातील इतरांना संसर्ग वाढण्याची भिती आहे. म्हणून तरूणांनी विनाकारण बाहेर पडू नका.

ही साथ विचित्र आहे. प्रत्येकाने आपल्या घरातील प्रिय व्यक्तींची काळजी घ्यायला हवी. आपण इथंपर्यंत लढत आलो आहोत. पुढची लढाई सुद्धा जिंकायची आहे. त्यामुळे लॉकडाऊन पुन्हा करण्याची वेळ येऊ नये, याची खबरदारी घ्या.

अर्थचक्र सुरू राहण्यासाठी आपण उद्योग व व्यवसाय सुरू करीत आहोत. हळूहळू काही निर्बंध हटवत आहोत. आजपासून केस कर्तनालये सुरू झाली आहेत. काही कार्यालये सुरू झालेली आहेत. उद्योग सुरू होत आहेत. पण संकट अजून संपलेले नाही. आपण कात्रीत सापडलेलो आहोत.

स्वतःला व कुटुंबियांना वाचविण्यासाठी घरातच राहा. अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नका. हे सरकार काळजीवाहू नाही. सरकार तुमची काळजी घेत आहे. पण तुम्हीही स्वतःची काळजी घ्या.

आपण बाहेर पडलो आणि बिनधास्त वावरलो तर नक्कीच धोका आहे. सुदैवाने महाराष्ट्रातील जनता सरकारच्या सुचना पाळत आहे. म्हणून तुमचा अभिमान वाटतो.

शेतकरी न थकता मेहनत करतोय. जमिनीत राबतोय. या शेतकऱ्यांसोबत आपण आहोत. बोगस बियाणांच्या तक्रारी आलेल्या आहेत. त्यावर आपण कारवाई करणार आहोतच. सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त योजना आणली. परंतु कोरोनामुळे अनेकांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेला नाही. त्यांनाही आपण कर्जमुक्तीचा लाभ देणार आहोत.

सर्व धर्मियांचे मी आभार मानतो. ईद, राम नवमी अशा सगळ्या सणांमध्ये सर्व धर्मियांनी काळजी घेतली आहे. सण साधेपणाने साजरे केले जात आहेत.

उद्धव ठाकरेंची घोषणा : ‘लॉकडाऊन’ नाही, पण निर्बंध कायम

मी आषाढी वारीसाठी जाणार आहे. आषाढीची परंपरा ७०० – ८०० वर्षांपासून सुरू आहे. मी सन २०१० मध्ये पांडूरंगाचे दर्शन घेतले होते. हेलिकॉप्टरमधून मी दर्शन घेतले होते. विठ्ठलाचे विश्वरूप मी आकाशातून पाहिले. वारकऱ्यांच्या रूपाने पाहिले. हे अप्रुप आहे.

या वारकऱ्यांनीही सरकारचे म्हणणे ऐकले आहे. मी विठूरायला साकडे घालणार आहे, की या विचित्र परिस्थितीतून जनतेला बाहेर काढ. विठ्ठला चमत्कार दाखव. वारकऱ्यांनो तुमचे आशिर्वाद माझ्या पाठीशी असूद्या. तुमचा प्रतिनिधी म्हणून विठूरायाला साकडे घालायला जाणार आहे.

दहिहंडी मंडळांनीही त्यांचा उत्सव रद्द केला. त्यांचेही मी आभार मानतो. आता गणपती, नवरात्र, ईद, दिवाळी, माऊंट मेरीची यात्रा असे एका मागोमाग एक सण येणार आहेत. गणपतीची मूर्ती चार फुटांपेक्षा जास्त नसेल याचा निर्णय घेतला आहे. गर्दी टाळण्यासाठीही आणखी काही निर्णय घेतले जाणार आहेत.

MoneySpring

‘कोरोना’तून जे लोक चांगले होऊन घरी गेले आहेत, त्यांनी रक्तदान करावे. प्लाझ्मा थेरपीसाठी त्याचा अन्य रूग्णांसाठी उपयोग करता येणार येईल असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

आपण १६ हजार कोटींचे उद्योजकांचे करार केले आहे. उद्योजकांशी आम्ही चर्चा करीत आहोत. शाळा व महाविद्यालये सुरू करण्यापेक्षा शिक्षण कसे सुरू करता येईल याकडे आपण लक्ष देत आहोत, असे त्यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी