29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeटॉप न्यूजतब्बल ७ तासांनी WhatsApp, Facebook, Instagram सेवा सुरु

तब्बल ७ तासांनी WhatsApp, Facebook, Instagram सेवा सुरु

टीम लय भारी

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅप (Whats App) इन्टाग्राम (Instagram) आणि फेसबुक (Facebook) सारख्या प्रसिद्ध असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोमवारी रात्री अचानक बंद पडले. रात्री ९ वाजल्यापासून व्हॉट्सअ‍ॅप,  इन्टाग्राम, आणि फेसबुक वापरताना युझर्सना अडचणी येत होत्या. मात्र तब्बल ७ तासांनंतर या सेवा पूर्वपदावर आल्या आहेत. मंगळवारी पहाटेपासूनच या सेवा सुरळीत काम करताना दिसत आहेत (WhatsApp, Facebook, Instagram service started after 7 hours).

परंतु, सोशल मीडियावर महत्वाचे असलेले तीन प्लॅटफॉर्म एकाच वेळी डाऊन झाल्याने युझर्सना मोठा फटका बसला आहे. युझर्सना झालेल्या त्रासाबद्दल फेसबुकने त्यांची माफी मागितली आहे. तसेच ‘आम्ही आमचे आम्ही आमचे अ‍ॅप, आणि सेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि आता हे सांगताना आनंद होत आहे की या सेवा पुन्हा सुरळीत झाल्या आहेत’. असे विधान फेसबुकने केले आहे.

जाणून घ्या बडीशेपचे आरोग्यगायी फायदे, बनवा बडीशेप फ्लेवरचा ग्रीन टी घरच्याघरी

kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रनौतला या मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी?

फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी देखील ट्विट करत युझर्सची माफी मागितली आहे.  ‘तुम्ही ज्या लोकांची काळजी करता त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तुम्ही आमच्या सेवांवर किती अवलंबून आहात याची आज आम्हाला पुन्हा जाणीव झाली. व्हॉट्स अ‍ॅप,,फेसबुक,इन्स्टाग्राम,मेसेंजर हे अ‍ॅप्स पुन्हा ऑनलाईन आले असून युझर्सना झालेल्या त्रासासाठी मी त्यांची माफी मागतो’. असे झुकरबर्ग यांनी म्हटले आहे.

तब्बल ७ तासांनी WhatsApp, Facebook, Instagram सेवा सुरु

शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का, शिवसेना माजी आमदाराने केला भाजपमध्ये प्रवेश

Global outage shuts down Facebook, Instagram, WhatsApp, triggers meme fest on Twitter

व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. १०० सेवा पूर्वपदावर येण्यासाठी काही वेळ लागले. कंपनी नेटवर्किंग समस्यांचा सध्या सामना करत असून त्यांची टीम लवकरात लवकर सेवा सुरू करण्यासाठी काम करत असल्याचे फेसबुकचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी Mike Schroepfer यांनी  म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी