28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमुंबईसीएसएमटी स्थानकातून पनवेलला जाणारी ट्रेन बफरला धडकली

सीएसएमटी स्थानकातून पनवेलला जाणारी ट्रेन बफरला धडकली

टीम लय भारी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकलला छोटासा अपघात झाला आहे. या लोकलने सीएसएमटी स्थानकात (CSMT Station) असलेल्या बफरला धडक दिल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. या अपघाताबाबतची आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक उशिराने सुरु असल्याची माहिती मध्य रेल्वेचे अधिकारी शिवाजी सुतार यांच्याकडून ट्विटरच्या मार्फत देण्यात आली आहे.

आज (दि. २६ जुलै २०२२) सकाळी ९.४० वाजताच्या सुमारास पनवेलच्या दिशेने निघालेली ट्रेन सीएसएमटी स्थानकात असलेल्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या बफरला धडकली. यामुळे लोकलचा एक डब्बा रुळावरून खाली उतरला. सीएसएमटी स्थानकात फक्त दोन प्लॅटफॉर्मवरून हार्बर मार्गावरील वाहतूक सुरु असते. या दोनच प्लॅटफॉर्मवरून गोरेगाव आणि पनवेलच्या दिशेने लोकल सुटतात. परंतु सकाळी कामाच्या वेळीच हा अपघात घडल्याने कर्मचारी वर्गाचा खोळंबा झाला आहे.

दरम्यान, या छोट्याशा अपघातात कोणतीही हानी झालेली नाही. या अपघातानंतर हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक उशिराने सुरु आहे. तसेच, हार्बर मार्गावरील लोकल वाहतुकीसाठी सीएसएमटी स्थानकात एकच प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे.

हे सुद्धा वाचा :

‘त्यांचे केवळ राजकारणासाठी हिंदुत्व…!’ शिवसेनाप्रमुख ठाकरेंचा शिंदेगटावर थेट आरोप

महाराष्ट्राच्या मातीचं तुम्हाला कधी वैभव दिसलं नाही का…? उद्धव ठाकरेंची तुफान शाब्दिक फटकेबाजी

डाव उलटणार! ‘या’ राज्यातील भाजपचे 16 आमदार फुटण्याची शक्यता?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी