राजकीयमंत्रालयमहाराष्ट्र

मोठी बातमी : अधिकाऱ्यांच्या बदल्या महिनाभर लांबणीवर

मलईदार पदांवर बदली (Transfers) मिळण्यासाठी मंत्रालयापासून तालुका स्तरापर्यंत हजारो अधिकाऱ्यांनी आकाश पाताळ एक केले. येत्या ३१ मे पर्यंत बदल्यांचे आदेश जारी होणार होते. परंतु आता बदल्यांचा निर्णय महिनाभर लांबणीवर गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

टीम लय भारी

मुंबई : मलईदार पदांवर बदली (Transfers) मिळण्यासाठी मंत्रालयापासून तालुका स्तरापर्यंत हजारो अधिकाऱ्यांनी आकाश पाताळ एक केले. येत्या ३१ मे पर्यंत बदल्यांचे आदेश जारी होणार होते. परंतु आता बदल्यांचा निर्णय महिनाभर लांबणीवर गेल्याचे सूत्रांनी सांगितले. (Transfers of officers postponed for a month)

मोठी बातमी : अधिकाऱ्यांच्या बदल्या महिनाभर लांबणीवर

अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी आमदारांना फार सारस्य असते. हव्या त्या अधिकाऱ्याला हव्या त्याठिकाणी नियुक्ती देण्यासाठी आमदार मंत्र्यांकडे शिफारसी करतात. सगळ्याच आमदारांच्या शिफारसी मान्य होत नाहीत. ज्यांच्या शिफारसी मान्य होत नाहीत ते आमदार मंत्र्यांवर आणि सरकारवर नाराज होतात. विशेषत: सत्ताधारी पक्षांच्या आमदारांची मर्जी संपादन करताना मंत्र्यांच्या नाकीनऊ येतात.

आमदारांच्या नाराजीच्या कारणावरुन बदल्यांचा आदेश महिनाभर पुढे ढकलण्यात आला आहे. विधानपरिषदेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. या निवडणुकीत बदली प्रकरणातील नाराज आमदार राग काढतात. असे झाले तर विधानपरिषद निवडणूकीत मोठा गहजब होईल. त्यामुळे या निवडणुकांनंतरच बदल्यांचे आदेश  जारी होतील असे सुत्रांनी सांगितले आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन बदल्या पुढे ढकलण्याची विनंती केली होती.

आमदारांची संभाव्य नाराजी हा मुद्दा थोरात आणि चव्हाण यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मांडला होता असे सूत्रांनी सांगितले.


हे सुद्धा वाचा : 

 

रात्री IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, सकाळी स्थगिती दिली

एसटीच्या ६२३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या; कारवाईसाठी आगारनिहाय यादी

‘मंत्रालयात बदल्या, जमिनींच्या व्यवहारात करोडोंची उलाढाल’

५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Video : पोलिसांच्या बदल्यांना पुन्हा मुदतवाढ, हतबल पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांमध्ये सरकारविषयी संताप

 

 

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close