30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeटॉप न्यूजट्वीटरकडून कर्मचाऱ्यांना कायम वर्क फ्रॉम होमची सुविधा

ट्वीटरकडून कर्मचाऱ्यांना कायम वर्क फ्रॉम होमची सुविधा

टीम लय भारी

नवी दिल्ली: ट्वीटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी या महिन्यात ट्वीटर जगभरातील त्यांच्या कार्यालयात काम सुरु करत असल्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी केलेल्या या ट्वीट मध्ये पराग यांनी कर्मचाऱ्यांना एक खास भेट सुद्धा दिली आहे. त्यामुळे ऑफिस मधून काम करायचे की कायम वर्क फ्रॉम होम करायचे याचा निर्णय कर्मचारी वर्गावर सोडला गेला आहे.(Twitter employees Permanent work from home facility)

अर्थात पराग यांनी कार्यालयात प्रत्यक्ष येऊन काम केल्याने व्हायब्रंट कल्चर मिळते, बिझिनेस साठी त्वरित प्रवास सुरु करता येतो असे फायदे सांगितले आहेत. १५ मार्च पासून ट्वीटरची सर्व कार्यालये सुरु होत आहेत असे लिहिताना पराग म्हणतात, कुठून काम करायचे, कुठून काम करणे सुरक्षित वाटते, कामानिमित्ताने करावा लागणार प्रवास करण्याचा आहे किंवा नाही याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घ्यायचा आहे.

 जेथून त्यांना जास्त चांगले काम करता येईल असे वाटते तेथून ते काम करू शकतील. घरून अधिक चांगले काम होईल असे वाटत असेल त्यांनी घरून काम करण्यास हरकत नाही. कोविड १९ उद्रेकानंतर ऑफिस मध्ये परतून काम करण्याची शक्यता कमी झालीच होती पण आता परिस्थिती सामान्य आहे तरीही कर्मचारी वर्क फ्रॉम होम करू शकणार आहेत.

हे सुद्धा वाचा

FB, Twitter पाठोपाठ ट्रम्प यांना Google चाही दणका; YouTube अकाऊंट केलं बंद

तब्बल ७ तासांनी WhatsApp, Facebook, Instagram सेवा सुरु

आनंद महिंद्रांनी एअर इंडियासाठी टाटा ग्रुपला दिल्या शुभेच्छा

Russia Ukraine War: Russia Allegedly Blocks Access To Facebook, BBC, Twitter And App Stores

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी