29 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षण रद्द केल्याने भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आक्रमक

मराठा आरक्षण रद्द केल्याने भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आक्रमक

टीम लय भारी

मुंबई :-  सुप्रीम कोर्टाने बुधावरी मराठा आरक्षण रद्द केले आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे उद्यनराजे भोसले आक्रमक झाले आहेत (Udyan Raje Bhosale has become aggressive due to cancellation of Maratha reservation). मराठा आरक्षण निकाल भाजप खासदार उद्यनराजे भोसले यांना मान्य नाही, त्यांनी लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडून देऊ नका, त्यांना रस्त्यातच आडवा, असे आदेश उदयनराजे यांनी मराठा बांधवांना दिले आहेत.

उदयनराजे भोसले (Udyan Raje Bhosale) यांनी मराठा बांधवांना उघडपणे चिथावणी दिल्याने आगामी काळात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय अधिक तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द ठरवला आहे. त्यानंतर पहिल्यांदाच छत्रपती उदयनराजे भोसले (Chhatrapati Udyan Raje Bhosale)  यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जरी असला तरी राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation)आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे.

पश्चिम बंगालसारखा निर्लज्ज राजकीय खेळ महाराष्ट्रात खेळू नका, चव्हाणाचं फडणवीसांना प्रत्युत्तर

राहुल गांधीनी पंतप्रधान मोंदींना लिहिले पत्र, मांडला महत्त्वाचा मुद्दा

Coronavirus: Plea in Delhi HC seeks vaccines for Class 10, 12 students appearing for board exams

वेगवेगळ्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी आतापर्यंत आपली भूमिका का स्पष्ट मांडली नाही?, असा संतप्त सवाल उपस्थित करत उदयनराजे भोसले (Udyan Raje Bhosale) यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना टोला लगावला आहे. मराठा समाजाने यापुढे आंदोलन करू नये, त्यापेक्षा निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीना रस्त्यात आडवा आणि घरातून बाहेर फिरू देऊ नका, असा आदेश मराठा समाजाला दिला आहे.

राज्य सरकारची जबाबदारी नाही का?

कोणत्याही पक्षाचे का असेना त्या आमदार आणि खासदारांना रस्त्यात आडवा, जाब विचारा, मराठा आरक्षणाचे काय झाले हे विचारा, असे सांगतानाच जरी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले असले तरी राज्य सरकारची काही जबाबदारी नाही का? राज्य सरकार जबाबदारीपासून हात झटकू शकत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

16 मे पासून मोर्चा

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द केल्यानंतर आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाने पुन्हा मोर्चे काढण्याचा निर्धार केला आहे. बीडमध्ये मराठा आरक्षण (Maratha Reservation) संदर्भातील बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन संपल्यावर 16 मे पासून मोर्चा काढण्यावर एकमत झाले. बीडमधून पहिला मोर्चा काढला जाणार आहे. हे मोर्चे राज्यभरात काढण्यात येतील, अशी माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली.

कोर्टाने काय म्हटले?

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द केले असून राज्य सरकारचा कायदा रद्द केला आहे. तसेच गायकवाड समितीच्या शिफारशीही नाकारण्यात आल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती दिसून येत नाही. त्यामुळे एसीबीसीच्या नावाखाली देण्यात आलेले आरक्षण आम्ही रद्द करत आहोत, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी