38 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्रउदयनराजे भोसले यांची राज्य सरकारवर खोचक टिका

उदयनराजे भोसले यांची राज्य सरकारवर खोचक टिका

टीम लय भारी

मुंबई :- उदयनराजे (Udayan Raje) आणि संभाजीराजे यांची आज पुण्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बैठक झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उदयनराजे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली (Udayan Raje strongly criticized the state government). मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने (State Government) एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी भाजपा खासदार छत्रपती उदयनराजे (Udayan Raje) यांनी केली आहे.  

“मराठा आरक्षण ही राज्याची जबाबदारी आहे. जर हे सगळे आमदार, खासदार एवढे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असतील तर नेमकी समस्या काय आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार सोडून द्या सगळे…मी सगळ्यांबद्दलच विचारतो. विशेष अधिवेशन बोलवा ना तुम्ही…लाईव्ह प्रक्षेपण करा. पण हे सभागृहात गेल्यावर एक बोलतात आणि बाहेर आल्यावर दुसरे बोलतात,” अशी टीका यावेळी उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) यांनी केली.

पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीमुळे कारने आत्महत्या केली; जितेंद्र आव्हाडांनी मोदी सरकारला लगावला टोला

बिहार निवडणुकीमुळे महाराष्ट्राची बदनामी का?, सुशांतसिंहचा हत्यारा कोण?; नवाब मलिक

Former Telangana minister Eatala Rajender joins BJP

केंद्राच्या भूमिकेसंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, “दम असेल तर अधिवेशन बोलवावे. आधीने राज्याने धाडस असेल तर अधिवेशन घेऊन दाखवावे नंतर मी केंद्राचे पाहतो,” असेही ते म्हणाले आहेत. “अधिवेशन बोलवून गायकवाड कमिशनच्या रिपोर्टवर चर्चा करावी. आता जस्टीस भोसले यांचा रिपोर्ट आला आहे. थप्पी गोळा करुन काय रद्दीत विकून त्यावर राज्य चालवणार का? काय फालतुगिरी सुरु आहे,” असा संताप व्यक्त करताना उदयनराजेंनी (Udayan Raje) यांना आधी अधिवेशन घेऊ द्या, मग रुपरेषा ठरवतो. मग एकेकाला कसे गाठायचे ते मी बघतो असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

आमच्यावरही हल्ला होईल

“आपण जात कधी पाहिलेली नाही, पण आता तर लहानपणाचे मित्रदेखील अंतर ठेवून बोलतात. ही फळी कोण निर्माण करत आहे, तर ते राज्यकर्ते करत आहे. समाजाचा याच्याशी काही संबंध नाही. आरक्षण द्यायची इच्छाच नसून राजकारण करायचे आहे. व्यक्तीकेंद्रीत राजकारण सुरु असून उद्रेक झाला तर राज्यकर्ते जबाबदार असतील. त्यावेळी आम्ही देखील थांबवू शकणार नाही. आम्ही आडवे आलो तर आमच्यावरही हल्ला करायला थांबणार नाहीत. अशी वेळ येऊ देऊ नका, पण ही वेळ येणार आहे,” अशी भीती उदयनराजेंनी (Udayan Raje) व्यक्त केली आहे.

संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा

“मुद्द्यांवर आधारित राजकारण केले तर लोक पाठिंबा देतील. मुद्दे घेतले जात नाहीत तर समाजाच्या आधारे राजकारण केले जात आहे. कारण नसताना इतकी मोठी दुफळी निर्माण केली आहे. न्यायालयावर तर माझा विश्वासच नाही,” असे उदयनराजेंनी (Udayan Raje) यावेळी सांगितले. उदयनराजे (Udayan Raje) यांनी यावेळी संभाजीराजेंनी पुकारलेल्या मूक आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे सांगितले. त्यांनी काय करावे हा त्यांचा मुद्दा आहे, शेवटी मराठा आरक्षण हेच ध्येय आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

“राज्यकर्त्यांना आतापर्यंत फार मुभा दिली आहे. निवडून आल्यानंतर लोकशाहीतील हे जे राजे आहेत त्यांनाही जाब विचारला पाहिजे. राजेशाही होती तेव्हा असे नव्हते. लोकशाही अस्तित्वात आल्यानंतर ते राजे नीट वागत नसले तर त्यांना आडवा आणि गाढले पाहिजे असे ठाम मत आहे. त्यांना जाब विचारा आणि त्याची सुरुवात माझ्यापासून करा. प्रत्येक आमदार, खासदाराला विचारले पाहिजे. किती दिवस लोकांना संभ्रमावस्थेत ठेवणार आहात आणि हा अधिकार कोणी दिला,” असा संतापही उदयनराजेंनी (Udayan Raje) व्यक्त केला.

सुप्रीम कोर्टाने अहवाल वाचलाच नाही

भाजपा नेत्यांच्या टीकेसंबंधी विचारण्यात आले असता उदयनराजेंनी (Udayan Raje)  म्हटले की, “पाच बोट जशी सारखी नसतात तसे प्रत्येकाचे वेगळे मत असते. माझी मूल्य वेगळी आहेत. मी जमिनीवर परिस्थिती पाहून चालणार माणूस आहे. कायदा वैगेरे मी मानत नाही”. यावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी गायकवाड कमिशनचा अहवालच वाचलेला नाही, हा माझा आरोप नाही तर ठाम मत आहे असेही उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle)  म्हटले.

“यामध्ये पक्ष आणू नका. मी जे बोलतोय ते सर्वांना लागू होते. काँग्रेस, भाजपा, आरपीआय, जनता दल वैगेरे…मग सरकार किंवा लोकप्रतिनिधी कोणतेही असो. पण येथे समाजाचा प्रश्न आहे,” असेही उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी