30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमुंबईउद्धव ठाकरेंचा आरोप; भाजपला शिवसेना संपवायची आहे

उद्धव ठाकरेंचा आरोप; भाजपला शिवसेना संपवायची आहे

टीम लय भारी

मुंबई : गेल्या ५ दिवसांपासून राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. सत्तेत असेलल्या सत्ताधाऱ्यांची सत्ता त्यांच्याच आमदारांच्या बंडखोरीमुळे जाण्याच्या मार्गावर आहे. पण यापुढे देखील आपलीच सत्ता कायम राहणार असल्याचे वारंवार सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. पण बंडखोरी केलेले आमदार काहीही करून ही सत्ता पाडण्याच्या मागे लागले आहेत.

हे सत्तानाट्य सुरु झाल्यापासून शांत असलेले मुख्यमंत्री यांनी बुधवारी पहिल्यांदा जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला आणि मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला सोडला. त्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दृकश्राव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शिवसेना नागरसेवकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. भाजपला शिवसेनेचे विचार आणि शिवसेना संपवायची आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मी तुमच्या साथीने सभा घेणार आहे. शिवसेना ही मर्दांची सेना आहे. राजकारणात आपण पुढे जात आलेलो आहोत, आत्ताचा प्रसंग वेगळाही आह, आणि नाहीही आहे. असे यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना मी म्हटलं होतं, दगा देणारे मला नकोयत. विष प्रशन आम्ही करतोय, असं म्हटलं होतं. काँग्रेस राष्ट्रवादी पाठीत खंजीर खुपसतील म्हणत होते, पण आज पवार साहेब आणि सोनियाजी पाठीशी आहेत , पण जवळचे सोडून गेलेत, असे म्हणत त्यांनी बदनखोरांचे कान टोचले.

बंडखोरी करण्याआधी एकनाथ शिंदे हे आदित्य ठाकरे सोबत अयोध्येला गेले होते. त्याचवेळी कामाख्याला जाऊन त्यांनी प्रार्थना केली होती. शिवसेनेविषयी एवढे प्रेम आहे, मग गेलात कशाला? मला मुख्यमंत्री पदाचा मोह नाही, बाळासाहेबांनी सांगितलं म्हणून मी वेडा वाकडा वागणार नाही. तुम्हाला जर मी पक्ष चालवायला नालायक वाटत असेल, तर शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला केलेलं आवाहन तुम्ही विसरा. शिवसेना चालवायला मी तुम्हाला योग्य वाटत नसेल तर, मला सांगा. मी आत्ता शिवसेना पक्षप्रमुख पद मोकळं करायला तयार आहे. कोणी या.. शिवसेना पुढे न्या, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला सुनावले. देशाच्या राजकारणात भाजपचे हिंदुत्व अस्पृश्य होत. शिवसेनेने भाजपला सोबत घेतलं आणि आपला हात धरून ते पुढे आले. तेव्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला हाक दिली पण आज आपण त्याची फळं भोगतोय. काहींचे खिदळत असलेले फोटो समोर येत आहेत, तर येउद्यात. त्यांना भाजपमध्येच जावे लागणार आहे. त्यांचं हे नाटक जस्ट काळ टिकणार नाही.

भाजपमध्ये जाऊन तुम्ही मुख्यमंत्री होत असाल, शिवसेनेने तुम्हाला जे काही दिल ते तुम्हाला भाजपमध्ये जाऊन मिळणार असेल, तर बिनधास्त जा. तुम्ही निवडून आलेल्यांना घेऊन जाऊ शकता, पण ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांना तुम्ही फोडू शकत नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी बंडखोरांना सांगितले.

आता आपण निवडणुकीसाठी तयार आहोत. रक्ताचं पाणी करून शिवसेना पुन्हा वाढवूं, असे आत्मविश्वासाने उद्धव ठाकरे यांनी दृकश्राव्याच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील नगरसेवकांना मार्गदर्शन केले.

हे सुद्धा वाचा :

सर्वाधिक गद्दार कोण ? एका साधूने एकनाथ शिंदेंकडे दाखवले होते बोट

मंत्री संदीपान भुमरे यांनी गद्दारी केल्यानंतरही त्यांना ठाकरे सरकारकडून गिफ्ट

शिंदे नाही तर मग ‘त्या‘ हाॅटेल मधून कोण बाहेर पडलं ?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी