28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराजकीय'त्यांचे केवळ राजकारणासाठी हिंदुत्व...!' शिवसेनाप्रमुख ठाकरेंचा शिंदेगटावर थेट आरोप

‘त्यांचे केवळ राजकारणासाठी हिंदुत्व…!’ शिवसेनाप्रमुख ठाकरेंचा शिंदेगटावर थेट आरोप

टीम लय भारी

मुंबई : शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर मविआ सरकार काही दिवसांतच कोसळले आणि राज्यात नवे शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाले. यादरम्यान शिंदे गटाची ताकद प्रचंड वाढली. आमदार, खासदार, नगरसेवक, युवासेनेतील तरुण, अगदी शिवसैनिक सुद्धा मोठ्या संख्येने शिंदे गटाकडे वळले आणि शिवसेनेला मोठे भगदाड पडले. दिवसेंदिवस शिंदे सेनेची वाढत चाललेली क्रेझ, शिवसैनिकांना धीर देण्यासाठी आदित्य ठाकरे यांचा ‘शिवसंवाद यात्रा’, शिंदे गटाचे ‘मिशन विदर्भ’, जल्लोष, वादावादी, मारहाण, हल्ले, मोर्चे या सगळ्याच पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेली मुलाखत चांगलीच वादळी ठरली आहे.

उद्धव ठाकरे यांनी नुकतीच शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ला मुलाखत दिली, यावेळी संपादक संजय राऊत यांनी विचारलेल्या सगळ्याच प्रश्नांची त्यांनी अगदी दिलखुलासपणे उत्तरे दिली. यावेळी राऊत यांनी उपस्थित केलेल्या हिंदुत्वाच्या प्रश्नावर “त्यांचे केवळ राजकारणासाठी हिंदुत्व” असे म्हणत त्यांनी शिंदे गटाला फटकारले आहे. सध्या हिंदुत्वाच्या मुद्यावरून देशाचे वातावरण तापले असताना महाराष्ट्रात सुद्धा हिंदुत्वाच्या आणभाका घेत, हिंदुत्वाचे पुरस्कर्ते म्हणून शिंदे गट आपली बाजू आणखी मजबूत करीत असल्याचे दिसून येत आहे.

मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आतासुद्धा त्यांना हिंदुत्वामध्ये भागीदारी नको असेल..पण माझं नेहमी असंच म्हणणं आहे की शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वासाठी राजकारण केलं..कारण हिंदुत्व मजबूत व्हायला..हे जे करताहेत ते राजकारणासाठी हिंदुत्व वापरताहेत.. हा आमच्या आणि त्यांच्या हिंदुत्वातला फरक..जे विचारतात ना तुमच्या आणि भाजपच्या हिंदुत्वातील फरक काय तो हा आहे..शिवसेनेचं राजकारण हे आम्ही हिंदुत्व मजबूत होण्यासाठी केलं..पण यांचं राजकारण मजबूत होण्यासाठी यांनी हिंदुत्वाचा आसरा घेतला आहे, असे म्हणून उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपच्या दिखावू हिंदुत्वाचा बुरखा फाडत प्रखर टीका केली आहे.

केवळ हिंदुत्वाचा मुद्द्याला ढाल बनवत राज्यातील जनतेला भूलवण्याचे काम करणाऱ्या नव्या शिंदे – फडणवीस सरकारला उद्धव ठाकरे यांनी आपल्या ठाकरी शैलीत खऱ्या हिंदुत्वाचा अर्थ समजावित कडाडून प्रहार केला आहे.

हे सुद्धा वाचा…

महाराष्ट्राच्या मातीचं तुम्हाला कधी वैभव दिसलं नाही का…? उद्धव ठाकरेंची तुफान शाब्दिक फटकेबाजी

डाव उलटणार! ‘या’ राज्यातील भाजपचे 16 आमदार फुटण्याची शक्यता?

रणजितसिंह डिसले गुरुजींना आणखी एक मानाचा पुरस्कार जाहीर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी