सारथी संस्थेच्या उभारणीसाठी नवी मुंबई खारघर येथील भूखंड देण्याचा मुख्यमंत्र्याचा निर्णय
मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्याच्या मुख्यमंत्रानी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. त्यापैकी एक निर्णय हा सारथी संस्थेसाठी महत्त्वपूर्ण आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेस नियोजन विभागामार्फत नवी मुंबईतील खारघर सेक्टर 37, मधील 3 हजार 500 चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड देण्याचा निर्णय झाला.

टीम लय भारी
नवी मुंबई : मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्याच्या मुख्यमंत्र्यानी (Uddhav thackeray) काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. त्यापैकी एक निर्णय हा सारथी संस्थेसाठी महत्त्वपूर्ण आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेस नियोजन विभागामार्फत नवी मुंबईतील खारघर सेक्टर 37, मधील 3 हजार 500 चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड देण्याचा निर्णय झाला.(Uddhav thackeray decision to allot land Navi Mumbai)
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला निर्णय pic.twitter.com/bSVWfAf— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 26, 2022
राज्य शासनाने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी या संस्थेची स्थापना केलेली आहे. सारथी संस्थेमार्फत राज्यातील पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती व मुंबई येथे विभागीय कार्यालय, वसतिगृहे, अभ्यासिका व ग्रंथालय, कौशल्य विकास केंद्र, सैन्य व पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र, ज्येष्ठ नागरिक समुपदेशन कक्ष, महिला सक्षमीकरण केंद्र सुविधा (Uddhav thackeray) विकसित करण्यात येणार आहेत.
तसेच विद्यार्थ्यांसाठी 500 मुलांचे व 500 मुलींचे स्वतंत्र निवासी वसतिगृहदेखील विकसित करण्यात येईल. या अंतर्गत नवी मुंबई येथील केंद्रासाठी सिडकोच्या माध्यमातून खारघर सेक्टर 37, मधील 3 हजार ५०० चौ.मी. क्षेत्रफळाचा हा भूखंड नाममात्र दराने भाडेपट्ट्याने शासनाच्या नियोजन (Uddhav thackeray) विभागास देण्यात येणार आहे.
हे सुद्धा वाचा :-
Wear mask, Covid-19 cases on the rise: Maharashtra CM Uddhav Thackeray
पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत : गोपीनाथ गडाचं प्रोफाईल ठेवण्याचं जनतेचं आवाहन
फडणवीस सरकारने केलेल्या त्या पापाची फळे आजही धनगर समाज भोगत आहे : किशोर मासाळ