महाराष्ट्र

महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार आहे का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली माहिती

देशातील काही भागात कोरोना संसर्गाची रुग्ण संख्या वाढल्यानंतर निर्बंधांचा कालावधी परत येत असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशसह काही राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये मास्क पुन्हा एकदा अनिवार्य करण्यात आला आहे

टीम लय भारी

मुंबई : देशातील काही भागात कोरोना संसर्गाची रुग्ण संख्या वाढल्यानंतर निर्बंधांचा कालावधी परत येत असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशसह काही राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये मास्क पुन्हा एकदा अनिवार्य करण्यात आला आहे. दरम्यान, लॉकडाऊन सारखे निर्बंध टाळायचे असतील तर स्वयंशिस्त, मास्क वापरणे आणि लसीकरण करणे खूप महत्त्वाचे आहे, असा इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव (Uddhav Thackeray) ठाकरे यांनी जनतेला आवहान केला आहे. (Uddhav Thackeray given by Information,a lockdown in Maharashtra)

महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार आहे का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली माहिती

महाराष्ट्रातील जनतेला इशारा

यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही लसीकरण अनिवार्य करण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले आहे. एक महिन्यापूर्वीच कोविडशी संबंधित सर्व निर्बंध हटवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा आपल्या राज्यातील जनतेला बाहेर पडताना चेहऱ्यावरील मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. राज्यात कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असताना मुख्यमंत्र्यांचे हे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुंबईत बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी १०० हून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत.

राजेश टोपेंनी दिलेली माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) यांची व्हीसीच्या माध्यमातून बैठक घेतली. या बैठकीत देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतला तसेच काही सुचना राज्यांना दिल्या आहेत. लसीकरणावर भर देण्याची गरज असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या सर्व सूचना दिल्या आहेत. कोरोनाच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आणि कोविड-19 रुग्णांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला.

हे सुध्दा वाचा :- 

If You Want to Avoid Lockdown-like Restrictions…: Uddhav Thackeray Warns All Amid Fear of COVID Fourth Wave

सीआयएसएफ जवान हुतात्मा, रोहित पवारांनी व्यक्त केल्या भावना !

 

 

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close