34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयउद्धव ठाकरेंची भावनिक परंतु कणखर भूमिका 'बंडोबां'ची पंचाईत करणारी

उद्धव ठाकरेंची भावनिक परंतु कणखर भूमिका ‘बंडोबां’ची पंचाईत करणारी

टीम लय भारी

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी फेसबुकद्वारे जाहीर संवाद साधला. मी मुख्यमंत्री म्हणून कारभार करण्यास नालायक आहे, असे सांगा लगेच राजीनामा देतो. शिवसेना पक्षप्रमुखपदाचाही राजीनामा देतो, अशी भावनिक, परंतु कणखर भूमिका ठाकरे यांनी जाहीर केली.

उद्धव ठाकरेंनी घेतलेली ही भूमिका एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोरांची पंचाईत करणारी आहे. ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगण्याची हिंमत हे बंडोबा दाखविणार का असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी किती संख्याबळ लागते या खोलात मला जायचे नाही. परंतु शिवसेनेच्या एका तरी आमदाराने मला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगावा. मी तो लगेच देईन. एका जरी शिवसैनिकाने मला नालायक असल्याचे सांगावे.

मी पक्ष प्रमुख पदाचाही राजीनामा देईन.विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी किती संख्याबळ लागते या खोलात मला जायचे नाही. परंतु शिवसेनेच्या एका तरी आमदाराने मला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगावा. मी तो लगेच देईन. एका जरी शिवसैनिकाने मला नालायक असल्याचे सांगावे.

मी पक्ष प्रमुख पदाचाही राजीनामा देईन.मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा मी लिहून ठेवत आहे. कोणत्याही आमदाराने यावे हे पत्र राज्यपालांना नेहेून द्यावे. राज्यपालांनी मलाच बोलावले तरीही मी राजीनामा घेऊन जाईन. बंडखोर आमदारांना तिथून इथे येणे शक्य नसल्यास मला फोनवरून सांगावे. तरीही मी राजीनामा देईन, अशा शब्दांत ठाकरे यांनी सर्व बंडोबांना ठणकावले.

उद्धव ठाकरे यांचा संवाद जसाच्या तसा…

माझा आवाज हतबल नाही. बऱ्याच महिन्यांनंतर मी आलो. आहे. मला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर व आवाजात फरक जाणवेल. पण तसे बिल्कूल नाही.
मी महापौर म्हणूनही कधी काम केले नव्हते. मला मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच काम केले. पण जनतेने साथ दिली. मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांनी साथ दिली. प्रशासनानेही साथ दिली. त्यामुळे मी चांगले काम करू शकलो.
देशातील पाच टॉप महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये माझी गणना झाली. आताचा विषय कोविड घेवून आलेलो नाही. काही दिवसांपासून प्रसारमामध्यांसामध्ये शिवसेनेविषयी बातम्या येत आहेत. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता राहिलेली नाही. शिवसेनेने हिंदूत्व सोडलंय का असे सवाल केले जात आहेत.
मी लोकांना भेटत नाही असाही आक्षेप सांगितला जात आहे. काही दिवसांपूर्वी यात सत्य होते. कारण माझ्यावर शस्त्रक्रीया झाली होती. त्यामुळे ते दोन तीन महिने मला कुणालाही भेटता येत नव्हते. पण मी रूग्णालयातून ऑनलाईन बैठकांना उपस्थित राहिलेलो आहे. अन्य वेळी मी सगळ्यांना भेटायचो.
शिवसेना व हिंदूत्व एकमेकांशी जोडलेली आहेत, शिवसेना हिंदुत्वापासून कधीही फारकत घेवू शकत नाही. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे व अन्य नेते अयोध्याला जाऊन आले. हिंदूत्वाबद्दल विधानसभेत बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे.
बाळासाहेबांची शिवसेना आता राहिलेली नाही, असा काहीजणांचा आक्षेप आहे. आताची शिवसेना वेगळी आहे, असे चित्र तयार केले जात आहे. सन २०१२ मध्ये बाळासाहेब गेले. त्यानंतर सन २०१४ मध्ये आपण एकाकी लढलो होतो. प्रतिकूल परिस्थितीत आपण ६३ आमदार निवडून आणले होते. ती सुद्धा बाळासाहेबानंतरची शिवसेना होती. त्यावेळच्या सरकारमध्ये शिवसेनेचेही मंत्री होते.
त्यानंतर मी स्वतः मुख्यमंत्री झालो. मंत्रीपदे दिली. हे लाभ बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेने दिले हे लक्षात ठेवा. शिवसेनेचे आमदार गायब झाले. पहिल्यांदा सुरूतला गेले. नंतर गुवाहाटीला गेले. त्यातील अनेकांचे फोन आलेत.
नुकतीच विधानपरिषद निवडणूक पार पडली. सगळ्या आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले होते. तिथे मी गेलो होतो. एखादा जरी आमदार आजूबाजूला गेला तरी त्याच्यावर शंका घेतली जात होती. ही कसली लोकशाही आहे. एकमेकांवर शंका घेण्याइतपतची पातळी घसरली आहे. हे मला पटत नाही. बाळासाहेबांनाही हे पटत नव्हतं.
बाळासाहेबांना दिलेले वचन मी पाळणारच. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आपण गेली २० – २५ वर्षे लढत राहिला. पण याच काँग्रेस व राष्ट्रवादीने आपल्याला साथ दिली. आजही मला शरद पवारांचा, त्यानंतर कमलनाथ यांचा फोन आला. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास या दोघांनाही दाखवला. परंतु माझ्याच माणसांचा माझ्यावर विश्वास नाही.
मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत सरकार बनविण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी पवार साहेब मला म्हणाले. उद्धवजी जरा एक मिनिट बोलायचंय. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. कारण आमच्याकडे ज्येष्ठ नेते आहेत. काँग्रेसमध्येही ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे तुम्हाला नेतृत्व करावे लागेल.
मी त्यांना म्हणलो, साहेब चेष्ठा करीत आहात का ? मी यापूर्वी महापौर म्हणून सुद्धा काम केलेले नाही. पण शरद पवार, सोनियाजी यांनी माझ्यावर विश्वास टाकला. मी जिद्दीने काम करणारा माणूस आहे. एखादी जबाबदारी मिळाली तर ती जिद्दीने पूर्ण करीत असतो.
पण राजकारण कसंही वळण घेऊ शकतो. रडकुंडीचा घाटाप्रमाणे वळणदार राजकारण कुणाच्याही उपयोगाचं नाही. मला दुःख व आश्चर्य याचे वाटते की, मुख्यमंत्री पदावर मी नको म्हणून चर्चा केली जात आहे. माझीच लोकं मला नको म्हणताहेत. तुम्ही सुरतला जाऊन हे बोलण्यापेक्षा समोर येवून बोला. तुम्ही कारभार करण्यास नालायक आहात. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नकोत असे सांगा. मी आजच माझा कारभा वर्षावरून मातोश्रीवर हलवतो. मी बाळासाहेबांचा पुत्र आहे. खुर्चाला चिटकून राहणारा नाही. खुर्ची नसतानाही आम्ही कामे करून दाखविली आहेत.
‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ ही एक म्हण आहे. त्या मागील गोष्ट अनेकांना माहीत नाही. ती मी तुम्हाला सांगतो. एका झाडावर एक जण कुऱ्हाडीने घाव घालत होता. त्यावेळी त्या झाडाला पक्षी फुले म्हणाले तुला वेदना होत असतील ना. त्यावर ते झाड म्हणाले माझ्यावर घाव पडत आहेत, त्याच्या वेदना मला होत नाहीत. पण त्या कुऱ्हाडीचा दांडा माझ्याच फांदीपासून बनविलेला आहे. माझ्याच फांदीचे घाव माझ्यावर पडत आहेत, म्हणून मला वेदना होत आहेत.
शिवसेना तुमची जन्मदात्री आहे. तिच्यावरच तुम्ही घाव घालत आहात. मी तुमच्या हातावर माझ्या राजीनाम्याचे पत्र देतो. तुम्हीच ते राज्यपालांकडे घेवून जा. राज्यपालांनी बोलवले तर मी स्वतः घेऊन जाईल. मला कसलीही भिती नाही.
माझा शिवसैनिक माझ्यासोबत आहे, तो पर्यंत मी घाबरणारा नाही. शिवसैनिकांनाही माझे आवाहन आहे. बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही, असे तुम्हाला वाटत असेल तर एका जरी शिवसैनिकांनी मला फोन करून सांगावा. मी पक्षप्रमुख पदाचाही राजीनामा देवून टाकतो.
नाराज असलेल्या आमदारांना इथे येणे शक्य नसेल. मला तिकडून फोन करा. तुमचे भाषण फेसबुकवरून ऐकले. तुम्ही मुख्यमंत्रीपदी राहू नका, असे मला सांगा. मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे.
मी अजिबात नाटक करीत नाही. संख्याबळ कुणाकडे जास्त आहे हा मुद्दा गौण आहे. ती संख्याबळ प्रेमाने, जबरदस्तीने जमवता येते. त्यामुळे एका जरी आमदाराने मला फोन करून सांगितले तरी मी मुख्यमंत्रीपद सोडून टाकतो. माझे मन घट्ट करून बसलो आहे. या पदावर राहायची अजिबात इच्छा नाही. हे पद सदैव राहणार नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी