33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रसंयुक्त महाराष्ट्र स्मृति दालनाची लेझर शोच्या माध्यमातून माहिती मिळणार, मुख्यमंत्र्यांची सूचना

संयुक्त महाराष्ट्र स्मृति दालनाची लेझर शोच्या माध्यमातून माहिती मिळणार, मुख्यमंत्र्यांची सूचना

टीम लय भारी 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज संयुक्त महाराष्ट्र स्मृति दालनाची पाहणी केली. यावेळी संयुक्त महाराष्ट्र स्मृति दालनाचे नूतनीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या.  आज पाहणी केल्यानंतर या प्रदर्शनाबाबत सर्वसामान्यांना तसेच विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यादृष्टीने येथे लेझर शोच्या माध्यमातून माहिती दिली जावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. (Uddhav Thackeray inspects United Maharashtra Memorial Hall)

यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री असलम शेख आदी उपस्थित होते.मुंबई महानगरपालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी यावेळी मान्यवरांना दालनातील प्रदर्शनाच्या कामाबाबत माहिती दिली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दादर (पश्चिम) येथे २०१० मध्ये निर्मित संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाला ३० एप्रिल २०२२ रोजी एक तप पूर्ण झाले आहे. २८०० चौरस फूट क्षेत्रफळावरील हे विस्तीर्ण तीन मजली दालन म्हणजे संग्रहालय व कलादालन यांचा संगम आहे. येथे इतिहासावर आधारित फोटो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.


हे सुद्धा वाचा :

मुख्यमंत्र्यांनी विचारले भांडी आणलीत का? : नारायण राणे

मुख्यमंत्र्यांनी नांगी टाकली आहे का ?, गोपीचंद पडळकरांचा सवाल

मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या कार्यक्रमात केलेले विधान गंमतीत केले : नाना पाटोले

राज्यात कोरोनाचा उच्चांक, मुख्यमंत्र्यांनी पावसाळ्यात सज्ज रहाण्यासाठी दिले ‘हे’ निर्देश

Uddhav Thackeray pays tributes to martyrs on Maharashtra foundation day

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी