29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमुंबईउद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दाखवला आरसा

उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दाखवला आरसा

टीम लय भारी

मुंबई : कोणी कसं वागलं यात आपण जायचं नाही. कोरोनामुळे डोळ्यात पाणी आलं. ते अश्रु नाहीत. मला सत्तेचा मोह नाही. मी वर्षा सोडून मातोश्रीवर आलो. बाळासाहेबांचं माझ्याहून ही ‘लाडकं‘ अपत्य म्हणजे शिवसेना. मी लायक नसेल तर पद सोडायला तयार आहे. मुख्यमंत्री पद माझ्यासाठी गौण आहे. हे सारं भाजपनं केलयं. त्यांची आग्र्याहून सुटका करावीच लागेल. तुम्हाला जर भविष्य दिसत असेल तर खुशाल जा, असा इशारा त्यांनी यावेळी बंडखोर नेत्यांना दिला.

आपले काही लोक सेनेवर सोडण्यात आलेले आहेत. सेनेच्या अस्तित्वावर बोलणाऱ्यांना निष्ठा काय असते? हे दाखवावे लागेल. मला वीट आलायं. वीट आलाय म्हणजे मी वीट हाणणारच.. विठ्ठल बडव्यांवर जे बोलत आहेत, त्यांचा पोरगा खासदार आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवर देखील तीव्र शब्दात टीका केली. बाहेरच्या भाडोत्री लोकांना हाताशी धरून हे षडयंत्र रचण्यात आलंय. आमदारांना फूस लावून मी सत्तानाट्य का घडवेन?, असा आरोप करण्यात आला. मी जिद्द सोडलेली नाही.

माझं मुख्यमंत्री पद मान्य नसणं ही राक्षसी महत्वाकांक्षा आहे. झाडाच्या फांद्या न्या, फुलं न्या, मूळ मात्र नेवू शकत नाही. सोडून गेले त्यांचे मला वाईट का वाटावं? मला वाटलं मुख्यमंत्री पदाची खुर्ची हलतेय, मात्र ते मानेचं दुखणं होतं. माझ्या शास्त्रक्रियेबाबत पंतप्रधानांकडूनही विचारणा झाली. जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत उध्दव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं.

मेलो तरी सेना सोडून जाणार नाही असे बोलणारे शिवसेना सोडून गेले. मी बरा होवू नये म्हणून काही जण देव पाण्यात ठेवून बसले होते. बंडखोरांकडून सेना फोडण्याचं पाप झालंय. मात्र मी जिद्द सोडलेली नाही. ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा. माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरुन दाखवा. असा इशाराच उद्धव ठाकरेंनी यावेळी फुटीर आमदारांना दिला आहे.

तर कुटुंब प्रमुखाला धोका देता. एकनाथ शिंदेंसाठी मी काय कमी केले. त्यांना महत्वाचं नगर विकास खातं दिलं. माझी दोन खाती दिली. यावेळी एका तरुणीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या यवतमाळचे आमदार संजय राठोड यांच्यावर देखील निशाणा साधला. वाईट आरोप होवून सुध्दा मी त्यांना सांभाळलं, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी पुन्हा नव्या उमेदीनं सरकार टिकवण्याचा निर्धार केला. महाविकास आघाडीची त्यांना साथ आहे. संकट मोचक अशी ओळख असेलेले आणि राजकारणातले भीष्माचार्य अशी ओळख असेले शरद पवार त्यांच्या मदतीला आहेत. त्यामुळे सरकार पडणार नाही, असा आत्मविश्वास त्यांना वाटतो आहे.

हे सुद्धा वाचा :

शिंदे नाही तर मग ‘त्या‘ हाॅटेल मधून कोण बाहेर पडलं ?

एकनाथ शिंदेंच्या नुसत्याच बेटकुळ्या, विधानसभेत तोंडावर आपटण्याची शक्यता, शरद पवारांच्या खेळीकडे लक्ष

महाराष्ट्रातील राजकारणाची वाटचाल गुंडगिरीच्या दिशेने

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी