29 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराजकीयअंबरनाथ नगर परिषदेतही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसणार धक्का

अंबरनाथ नगर परिषदेतही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसणार धक्का

टीम लय भारी

अंबरनाथ : विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेना पक्षाला लागलेली गळती अद्यापही थांबण्याच्या तयारीत नसल्याचेचं दिसून येत आहे. राज्यातील प्रत्येक भागात शिवसेना पक्षाला खिंडार पडत असल्याचे दिसून येत आहे. ठाण्याच्या तब्बल ६६ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यानंतर आता अंबरनाथमधील नगरसेवक पण ‘बेडूक उड्या’ मारण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

अंबरनाथ नगर परिषदेतील २० नगरसेवक आणि २ नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. यावेळी अंबरनाथ विधानसभेचे आमदार बालाजी किणीकर देखील उपस्थित होते. या नगरसेवकांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंची भेट घेतल्याने या सर्व नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दररोज अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी आपले समर्थन देताना दिसून येत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्क्यावर धक्के सहन करावे लागत आहेत. दरम्यान, आधी ठाणे, मग कल्याण आणि आता अंबरनाथ मधील नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का मिळाला.

शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेनेचे दहा खासदार देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेकडून मातोश्री येथे खासदारांची बैठक बोलवण्यात आली होती. पण यावेळी शिवसेनेचे चार आमदार अनुपस्थित राहिल्याने शिवसेनेचे खासदार देखील बंडखोरी केल्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा :

काय सांगता…? 74 वर्षीय तरुणाचा चक्क मोटारसायकलवरून सांगली ते अमरनाथ प्रवास

शिंदे गटातील आमदार म्हणतात ‘मंत्री पद कोणाला नकोय?’

शिंदे गटातील आमदाराच्या गाडीला अपघात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी