34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedUIDAI ने उघडली देशभरात 166 आधार सेवा केंद्रे, पाहा कोणती कामे होणार

UIDAI ने उघडली देशभरात 166 आधार सेवा केंद्रे, पाहा कोणती कामे होणार

टीम लय भारी

नवी दिल्ली : भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ने देशभरात 166 स्वतंत्र आधार नोंदणी आणि अद्ययावत केंद्रे उघडली आहेत.(UIDAI opens 166 Aadhaar service centers across the country, see what works)शनिवारी एका अधिकृत निवेदनातून ही माहिती देण्यात आली. सध्या 166 पैकी 55 आधार सेवा केंद्र कार्यरत आहेत. याशिवाय बँका, पोस्ट ऑफिस आणि राज्य सरकारांद्वारे 52,000 आधार नोंदणी केंद्रे चालवली जात आहेत. 

UIDAI ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, UiIDAI 122 शहरांमध्ये 166 एकल आधार नोंदणी आणि अद्ययावत केंद्रे उघडण्याची योजना आखत आहे. आधार सेवा केंद्रे आठवड्यातून सात दिवस उघडली जातात. आतापर्यंत या केंद्रांनी दिव्यांग व्यक्तींसह 70 लाख लोकांची गरज भागवली आहे. मॉडेल ए च्या आधार सेवा केंद्रांमध्ये (मॉडेल-ए एएसके) प्रतिदिन 1,000 नावनोंदणी आणि अपडेट विनंत्या हाताळण्याची क्षमता आहे. त्याच वेळी मॉडेल बी केंद्रे (मॉडेल-बी एएसके) 500 आणि मॉडेल-सी एएसके 250 ही नावनोंदणी आणि अद्ययावत विनंत्या पूर्ण करू शकतात. आतापर्यंत UIDAI ने 130.9 कोटी लोकांना आधार क्रमांक दिलेत.

प्रियंका गांधींना सन्मानाने तुरुंगातून सोडले नाही तर, महाराष्ट्रात काँग्रेस जेल भरो आंदोलन करणार : नाना पटोले

‘स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचे सहकार मॉडेल देशाला दिशादर्शक’

आधार सेवा केंद्र खासगीमध्ये उपलब्ध नाही

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, खासगी सेवा केंद्रांवर आधार उपलब्ध नाही. आधार सेवा फक्त बँका, पोस्ट ऑफिसेस, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC), राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांचे कार्यालय आणि UIDAI द्वारे संचालित आधार सेवा केंद्रात उपलब्ध आहेत. आधार केंद्रे खासगीत चालत नाहीत. यासंदर्भात अधिक माहिती राज्य सरकारच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून मिळू शकते (ज्या अंतर्गत आधार केंद्रे चालू आहेत). ” तिथून प्रक्रिया स्पष्ट केली जाऊ शकते.

इंटरनेट कॅफेवाले आधार कार्ड बोर्ड लावून काय करतात?

दुसरीकडे तुम्ही इंटरनेट कॅफेमध्ये आधारचे पोस्टर्स, बॅनर इत्यादी पाहिले असतील. अशा परिस्थितीत ते कसे काम करतात, असा प्रश्न मनात निर्माण होतो. खरं तर कॅफे आधारशी संबंधित सेवा पुरवतात, जी यूआयडीएआय सामान्य माणसाला देते. आधार कार्डमधील नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा इतर तपशिलात दुरुस्ती करणे, फोटो बदलणे, पीव्हीसी कार्ड छापणे, सामान्य आधार कार्ड ऑर्डर करणे इत्यादी कामे केली जातात.

UIDAI च्या वेबसाईटवर हे काम तुम्ही स्वतः करू शकता

सामान्य माणूस UIDAI च्या वेबसाईटवर या सर्व गोष्टी स्वतः करू शकतो. आता मोबाईल अॅप्सही आलेत. पण जे टेक्नो फ्रेंडली नाहीत, ते इंटरनेट कॅफेकडे वळतात. या सेवांसाठी UIDAI ने आकारलेली रक्कम, त्यात काही पैसे जोडून, कॅफे मालक सामान्य माणसाकडून घेतो.

कॅफेवाला UIDAI शुल्कापेक्षा जास्त शुल्क घेतो

उदाहरणार्थ, जन्मतारीख सुधारण्यासाठी किंवा पीव्हीसी कार्ड मिळवण्यासाठी यूआयडीएआयची निश्चित फी 50 रुपये आहे, तर कॅफे मालक सामान्य माणसाकडून सुमारे 70 ते 100 रुपये घेतो. अशा प्रकारे, तो अशा कामांसाठी 30 ते 50 किंवा अगदी 100 रुपये कमावतो.

राज्य मार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात करण्यासाठी राज्य शासनाची केंद्राबरोबर चर्चा सुरू

UIDAI ने उघडली देशभरात 166 आधार सेवा केंद्रे, पाहा कोणती कामे होणार

Aadhaar Card Update: Here’s how to add mobile no., address via self service portal

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी