28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रसमाजात दंगे होऊ देणार नाही हा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार

समाजात दंगे होऊ देणार नाही हा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार

टीम लय भारी

मुंबई :राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्यावरून राजकारण तापले आहे. (Vanchit bahujan aghadi) अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये १ मे रोजी सभा घेण्याचे जाहीर केले आहे. या सभेसाठी राज ठाकरे यांना अटी आणि शर्तींवर परवानगी दिली गेली आहे. या संदर्भात काल दुपारी परवानगीचा आदेश निघाले. संपूर्ण राज्याचं या सभेकडे लक्ष लागून आहे. (Vanchit bahujan aghadi the take decision)

महाराष्ट्रात दंगली अथवा सामाजिक शांतता भंग होऊ नये या करीता १ मे रोजी वंचित बहुजन आघाडीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात शांतता मार्च काढण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना (Vanchit bahujan aghadi) पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर म्हणाल्या, राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात दंगे घडविण्याच्या दृष्टिकोनातून धार्मिक तेढ वाढवणारी भाषणे केली आहेत आणि म्हणून त्यांना औरंगाबादमध्ये सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली होती परंतू महाराष्ट्र सरकारचे वागणे अनाकलनीय आहे त्यांनी या सभेला परवानगी दिली आहे.

स्वार्थी राजकारणासाठी केले जाणारे हे प्रयोग आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. महाराष्ट्रात दंगली भडकणार नाही यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात शांतीचा संदेश देणारा शांतता मार्च १ मे रोजी काढण्यात येणार आहे. समाजात धार्मिक सद्भावना आणि सलोखा, शांती बिघडू न देणे, समाजात जागरूकता ठेवण्याचे आवाहन केले आहे. समाजात दंगे होऊ देणार नाही हा (Vanchit bahujan aghadi) वंचित बहुजन आघाडीचा निर्धार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेत नुकत्याच झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत देखील हीच भूमिका (Vanchit bahujan aghadi) प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी मांडली होती. याच धर्तीवर १ मे रोजी शांतता मार्चची जोरदार तयारी करण्यात येत असून त्याकरिता साडेसातशे युनिट कामाला लागले आहेत. हा शांतता मार्च यशस्वी करण्यासाठी वंचितचे सर्व स्तरावरील नेते, पदाधिकारी कायकर्ते मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले असल्याचे देखील रेखा ठाकूर यांनी दिली.

हे सुध्दा वाचा :- 

New ‘allies’ on the block: BJP and MNS

मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर, एसी लोकलच्या भाड्यात 50 टक्के कपात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी