28 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयसामाजिक न्याय दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

सामाजिक न्याय दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

टीम लय भारी

मुंबईः राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात येतो. उदया रविवार 26 जून रोजी राज्यातील विविध भागात राजर्षी शाहू महाराज जयंती दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अभिवादन सभा तसेच समता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

न्याय विभागाकडून याची माहिती देण्यात आली आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी शाहू महाराजांना अभिवादन करुन शुभेच्छा संदेश दिला आहे.

राजर्षी शाहू महाराजांनी आधुनिक समाजात समता व सामाजिक न्यायाचे मूळ रुजवले त्यांच्या विचार आणि प्रेरणेतूनच राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवून सामाजिक उन्नतीचे कार्य केले जाते.

हे सुद्धा वाचा :

गुवाहाटीतून सुरतमध्ये ‘रात्रीस खेळ‘चाले

‘एनसीपी’सोबत काम करतांना आमची घुसमट होते !

VIDEO : शंभूराज देसाईंचे कार्यकर्ते खवळले, गद्दार कुत्र्यांनो अडीच वर्षे पदे घेताना लाज वाटली नाही का ?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी