32 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रभावाच्या आत्महत्येनंतर वसंत मोरेंची भावनिक पोस्ट

भावाच्या आत्महत्येनंतर वसंत मोरेंची भावनिक पोस्ट

टीम लय भारी

पुणे : पुण्यातील मनसेचे माजी शहराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) हे सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्यांच्या फेसबुक टाईमलाइनवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. वसंत मोरे (Vasant More) यांचे चुलत बंधू रविंद्र गणपत मोरे यांनी सोमवारी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. भावाच्या या आकस्मिक निधनानंतर वसंत मोरे यांनी एक भावनिक पोस्ट लिहिली असून यातून जनतेला एक संदेश दिला आहे. (Vasant More’s emotional post)

रवी का रे असं केलंस ?
तू जायच्या दिवशी रविवारी सकाळीच ८:३० ला माझ्या समोर तब्बल १७ मिनिटे माझी प्रेस ऐकत बसला होतास,
मी तुझ्या नजरेत पाहिले आणि मला तुझ्या डोळ्यातल पाणी दिसलं ही होतं,
म्हणूनच मी तुला विचारले देखील काय रे रवी काय झालं…
आणि तू नेहमी प्रमाणे हसत बोलास
‘नाय आरे काय नाय…’
आणि निघून गेलास ते गेलास तो ही कायमचाच…
मला जेव्हा काल सकाळी तुझ्या पोराने तात्या शेतावर काहीतरी झालंय तेव्हाच माझ्या पोटात गोळा आला होता आणि मी गाडीतील मित्राना बोलो ही होतो त्याला मला काहीतरी सांगायचे होते राव…,
पण गर्दीमुळे आणि प्रेस मुळे तो कदाचित बोला नसेल.
तो सारा अंदाज तुझी चिट्ठी मिळताच पहिल्या वाक्यातच आला आणि नक्की कोण चुकलं तेच कळेना…
ते तुझं वाक्य
“तात्या मला माफ कर लय बोलायचं होते रे पण काय करू बोलता येत नाय”
बाकी खाली लिहलेले तुझे प्रॉब्लेम खूप किरकोळ होते रे…
जो तात्या रोज हजारो लोकांचे प्रश्न चुटकी सरशी सोडवतो त्याने तुझे प्रश्न नसते का रे सोडावले रवी ?
आरे रोज आपल्या ऑफिस च्या दारातील गर्दीतून रस्ता काढत जात होतास ना मग मी तुला त्या ही गर्दीत रस्ता दाखवला नसता का रे रवी ?यातून जनतेने एक मात्र नक्की घ्यावे की आपण बोलं पाहिजे…
बोलात की सहज कोणत्याही प्रश्नावर मार्ग निघतात…
आपली अडचण कोणासोबतही बोला पण बोला…
आत्महत्या हा प्रश्नावर अडचणीवरचा कधीच मार्ग होऊ शकत नाही.
समस्या कधीच संपत नाही पण त्यांची काळजी केली की संपतात ती जिवाभावाची माणसं,
तेव्हा आयुष्यात कोण तरी असं माणूस असले पाहिजे जिथे सुख दुःख सगळे मनमोकळे पणे मांडता आले पाहिजे…
रवी भावा तुला भावपुर्ण श्रद्धांजली, अशी पोस्ट वसंत मोरे (Vasant More’s emotional post) यांनी आपल्या मित्रासाठी लिहिली आहे.


हे सुद्धा वाचा : 

रोहित पवारांचा मनसेला सल्ला “आपल्या राजकीय मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करावी”

मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये ‘फोटोवॉर’

जितेंद्र आव्हाडांचा शायरीतून मनसेवर निशाना

भाजप आणि मनसेच्या राजकारण्यांमध्ये केमिकल लोचा झालाय : किशोरी पेडणेकर

Aaditya Thackeray’s ‘dead party’ jab at uncle Raj over letter to Uddhav Thackeray

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी